मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर आरोप करून जेरीस आणणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही दिवस शांत होते. मात्र, आता पुन्हा ते शिवसेनेच्या नेत्यांविरोधात आक्रमक होतांना दिसत आहेत.
शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचे सूचक ट्वीट सोमय्यांनी केले आहे. यामध्ये रिसॉर्टच्या बांधकामा संदर्भात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरवठा करत असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा सोमय्या विरूद्ध शिवसेना असा पुन्हा सामना रंगायला सुरूवात झाली आहे. (Anil Parab, Kirit Somaiya Latest News)
भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने २०१९ ला राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. यानंतर भाजपच्या नेत्यांनी आणि खास करून सोमय्यांनी महाविकास आघीडीतील मंत्री आणि महत्त्वांच्या नेत्यांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे मंत्री अनिल परब यांच्यासह अनेक नेत्यांवर आरोप केले होते. परब यांच्यावर ज्या दापोली येथील साई रिसॉर्टबांधकामावरून आरोप केले होते. त्याचसंदर्भात सोमय्या पुन्हा सक्रिय झाले आहेत. हा रिसॅार्ट परबांच्या मालकीचे असून त्यांनी पर्यावरणाचे नियम न पाळत येथे बांधकाम केल्याचा मुख्य आरोप सोमय्यांचा आहे. तसेच हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. यावरून गेल्या काही महिन्यापासून सोमय्यांनी शिवसेना आणि परब यांना लक्ष केलं आहे.
सोमय्यांनी आपल्या ट्वीटमध्ये "अनिल परब रिसॉर्ट..पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहोत...दोन चार दिवसांत रिसॉर्ट पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे". असे म्हटले आहे. यामुळे परबांच्या रिसॅार्टवर खरच कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे. या रिसॉर्ट प्रकरणी परबांची ईडीने चौकशी देखील केली होती. तसेच परब यांच्या शासकीय आणि खासगी निवासस्थानी छापाही मारला होता. त्यावेळी शिवसेनेकडून भाजप ही राजकीय सूडाने कारवाई करत असल्याचा आरोप केला होता.
पर्यावरण मंत्रालय भारत सरकारकडून 31 जानेवारी 2022 रोजी हे दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याने तोडण्याचे आदेश दिले होते. ते 90 दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले तरीही रिसॉर्ट पाडण्याची कारवाई झाली नव्हती.
सोमय्यांचे नेमके आरोप कोणते?
सोमय्यांनी परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांच्यावर मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली होती. १ कोटींमध्ये ही जागा घेतली होती. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचा दावा सोमय्यांनी केला होता.
दरम्यान, यावेळी आरोप करताना सोमय्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्रही पत्रकार परिषदेत दाखवली होती. 7 मे 2021 रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून परब यांनी 10 महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. 10 मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2021 परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2021 या काळासाठीचा 4 वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला.", असा दावा सोमय्यांनी केला होता. आता याप्रकरणी काय होते हे बघावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.