Supreme Court
Supreme Court  Sarkarnama
मुंबई

Hearing On Local Body Election: आज तरी सुनावणी होणार की नाही?

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Local Body Election: गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे आज तरी या प्रकरणावर सुनावणी होणार की, न्यायालय पुढची तारीख देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत होणारी सुनावणी सातत्यानं लांबणीवर पडत आहे.न्यायालयाच्या आजच्या कामकाजात हे प्रकरण 39 नंबरवर आहे. त्यामुळे कामकाजाच्या यादीत हे प्रकरण असलं तरी आज प्रत्यक्ष सुनावणी होणार की नाही, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

29 मार्च 2023 रोजी हे संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आलं होतं. पण त्यादिवशी न्यायालयाने आजची तारीख दिली. त्यानुसार आज हे प्रकरण पुन्हा एकदा कामकाजात समाविष्ट कऱण्यात आलं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून न्यायालयात या प्रकरणावर तारीख पे तारीख सुरु आहे.29 मार्चपूर्वी 28 मार्चसाही या प्रकरणावर सुनावणी होणार होती. पण घटनापीठाच्या कामकाजामुळे सुनावणी झाली नाही. 29 मार्च एका नव्या तारखेची मागणी करण्यात आली.

राज्यातील 92 नगरपरिषदांमध्येही ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू व्हावं, बदललेल्या प्रभाग रचनेला दिलेले आव्हान या गोष्टींमुळे निवडणुका खोळंबल्या आहेत. न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिला असला तरीही अद्याप 92 नगरपरिषदांसाठी निवडणूक आयोगाला आदेश देण्यात आलेला नाही, असं गेल्या वेळी वकीलांनी कोर्टात सांगितलं होतं. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातली प्रभागरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशानं बदलली. पण 22 ऑगस्टला न्यायालयाने जैसे थे आदेश दिला. त्यानंतर आत्तापर्यंत या प्रकरणाची सुनावणी झालीच नाहीये. (Political Breaking News)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT