Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

खासदार राऊतांच्या अटकेची अधिकृत घोषणा रात्री उशीरा होणार ?

ईडीच्या (Enforcement Directorate) बाराजणांच्या टीमने सुमारे नऊ तास खासदार राऊत यांची चौकशी केली.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना आज सायंकाळी सक्त वसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांना अटक केल्याचे ईडीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. रात्री उशीरा खासदार राऊत यांच्या अटकेची माहिती दिली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ विकसन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात खासदार राऊत यांची गेल्या काही महिन्यांपासून चौकशी करण्यात येत होती. एक जुलैला त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर समन्स बजावूनदेखील त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. संसद अधिवेशनानंतर आपण चौकशीला हजर राहू, असे त्यांनी कळविले होते. मात्र, ईडीचे पथक आज सकाळीच खासदार राऊत यांच्या घरी हजर झाले.

ईडीच्या बाराजणांच्या टीमने सुमारे नऊ तास खासदार राऊत यांची चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना ताब्यात घेऊन मुंबईतील कार्यालयात नेण्यात आले.यावेळी खासदार राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, खासदार राऊत यांची दिवसभर त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन ‘ईडी’ कार्यालयात नेण्यात आले. मात्र, त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. खासदार राऊत यांना अटक केल्याचे अधिकृतपणे रात्री उशिरा सांगण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘ईडी’ने तपासात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे खासदार संजय राऊत यांच्या मालकीची तब्बल ११ कोटी १५ लाख ५६ हजार रूपये किमतीची स्थावर मालमत्ता याआधीच जप्त केली आहे. आज दिवसभर खासदार राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर सायंकाळी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. ईडी कार्यालयातदेखील सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना अटक करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा रात्री उशीरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT