Raj Thackeray News| Devendra fadanvis News | MNS-BJP alliance news | MNS News Updates 
मुंबई

काय सांगता! मनसे-भाजप युती होणार?

Raj Thackeray| Devendra fadanvis| MNS-BJP alliance| राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंची गुडीपाडव्याची सभा, त्यानंतर ठाण्यात झालेली उत्तरसभा आणि आता औरंगाबाद येथे होणारी सभा, या सर्व सभांमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्यभरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. तर दूसरीकडे राज ठाकरे यांची हिंदूत्त्वाची भूमिका आणि त्याला भाजपचा मिळणारा पाठिंबा यामुळे राज्यात आता मनसे-भाजप युतीच्या चर्चांही जोर धरु लागल्या आहेत. (MNS-BJP alliance news)

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपचा वाढता पाठिंबा आणि हिंदुत्वाचा मुद्यावरून उत्तर भारतीयांचे राज ठाकरेंना वाढते समर्थन पाहता मनसे- भाजप युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळापासून सर्वसामान्यांपर्यंत सुरु झाल्या आहेत. तर दूसरीकडे मनसे ही भाजपचीच टीम असल्याचा विरोधकांचा आरोप आता सत्यात उतरणार का असा सवालही उपस्थित होत आहे.

राज ठाकरे यांंनी सुरुवातीला उत्तर भारतीयांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत भाजप मनसेसोबतच युतीचा कोणताही विचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. पण अलीकडे उत्तर भारतीयांप्रती राज ठाकरे यांची भूमिका नरमल्याने मनसे-भाजपा युती होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार असून यावेळी ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. पुण्यातूनच ते १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेसाठी रवाना होतील. या सभेच्या परवानगी पासून अनेक मुद्द्यांवर वाद निर्माण झाला होता. अनेक संघटनांनी या सभेला विरोध केला मात्र, औरंगाबाद पोलिसांनी अखेरच्या क्षणी अटी-शर्तींसह या सभेला परवानगी दिली. आता या सभेकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा आणि त्यानंतर होणाऱ्या अयोध्या दौऱ्याच्या आसपास युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अयोध्या दौऱ्यात राज ठाकरे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT