‘ठाकरेंवर टीका करा अन वाय सुरक्षा मिळवा; मोदी सरकारची नवी योजना’

खासदार नवनीत राणांसारखे लोक कुणाच्या ना कुणाच्या करारावर असतात, त्यामुळे ते वेळोवेळी त्याप्रमाणे बोलतात.
Nilam Gorhe
Nilam GorheSarkarnama
Published on
Updated on

राजगुरूनगर (जि. पुणे) : ‘‘खासदार नवनीत राणांसारखे (Navneet Rana) लोक कुणाच्या ना कुणाच्या करारावर असतात, त्यामुळे ते वेळोवेळी त्याप्रमाणे बोलतात. राणा मागे राम मंदिराविरुद्ध बोलल्या होत्या. मंदिर प्रवेशाच्या विरुद्ध बोलल्या होत्या. निवडून येईपर्यंत राष्ट्रवादीच्या (ncp) बाजूने बोलत होत्या. आता फडणवीस आणि अमित शहांच्या बाजूने बोलत आहेत. केंद्राने एक योजना सुरू केली आहे, उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करा आणि ‘वाय’ सुरक्षा मिळवा. नारायण राणे, किरीट सोमय्या, कंगना रागावत यांच्या पंक्तीत आता राणा जाऊन बसतील,’’ अशी प्रखर टीका विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केली. (Criticize Uddhav Thackeray and get security; Modi government's plan : Neelam Gorhe)

भाजप आणि मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होत आहे. भाजपवाले २०१४ मध्ये धर्माचे नाहीतर विकासाचे राजकारण करणार, असे सांगत होते. आता त्यांची वेगळी भूमिका आहे. मनसेचा तर पंचरंगी ध्वज होता, तो आता बदलला आहे. राज ठाकरे यांना कुठलाही लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ नाही, तर त्यांचा ‘माध्यम मतदारसंघ’ हा एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात त्यांचे साम्राज्य उभे राहिल. पण, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र त्यांना एक इंचाची जागा मिळणार नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. अमृता फडणवीसांना ‘लाईटली’ घ्या अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Nilam Gorhe
'नोकरीवरून काढण्याची धमकी देत कर्मचाऱ्यांचा भाजप प्रवेश केला जातोय...'

भोंग्यांच्या विषय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मशिदींबरोबर मंदिरांवरही बंधने आली आहेत. मुळात आवाजाच्या पातळीचा विषय त्या राज्यातल्या मशिदी किती पाळतात, हाही संशोधनाचा विषय आहे, असे त्या म्हणाल्या.

Nilam Gorhe
अजितदादा मुख्याध्यापकाला दिलेला शब्द पाळणार का?

भाजपची अवस्था ‘कोल्ह्याला द्राक्ष आंबट’ या म्हणीसारखी झाली आहे. राष्ट्रवादी भाजपबरोबर न जाता, शिवसेना बरोबर आली, याचे त्यांना इतके दुःख झाले की, दोन वर्षे झाली तरी ते कमी होत नाहीये. मैत्री आणि दातृत्वाचा गप्पा भाजपने मारू नयेत, त्यांनी ५५ ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले होते, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Nilam Gorhe
राष्ट्रवादीशी युती न करणे, ही आमची चूक होती अन्‌ त्याचे प्रायश्चित सध्या भोगतोय!

भाजपकडे इतर पक्षातून गेलेले आमदार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांना आपले सरकार येणार आहे किंवा हे सरकार जाणार आहे, असे सतत सांगावे लागते. आता २०२४ ची निवडणूक होऊन आम्ही परत निवडून येईपर्यंत, ते असेच सांगत राहणार आहेत. कोल्हापूरच्या निकालाने जनता कोणाच्या बाजूने आहे, हे लक्षात आले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वस्तुस्थिती लक्षात येईल. आमची तीन पक्ष मिळून आघाडी असली, तरी त्यांच्याकडेही इतर पक्ष आणि खोत, जानकर यांच्यासारख्यांची निम्मी संख्या आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Nilam Gorhe
राष्ट्रवादी सोडताच काँग्रेसकडून मिळाली कारखान्याच्या उमेदवारीची बक्षिसी!

महाराष्ट्राला सर्व पातळीवर डावलण्याची भूमिका केंद्र सरकार घेत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचा जीएसटी जाणून-बुजून दिला जात नाही. तरी महाराष्ट्र प्रगती करत आहे. राज्यात उद्योगांचे करार होत आहेत. विरोधक मात्र राज्य सरकारचा कमीपणा दाखवून संघराज्याच्या भावनेला आव्हान देत आहेत. महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय पातळीवर स्थिर होऊ द्यायचा नाही, अशी त्यांची भूमिका आहे. राज्यात चांगल्या घडत असलेल्या गोष्टींकडे लोकांचे लक्ष जाऊ नये, याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या कायद्यांमुळे मात्र शेतकरी कामगार उद्ध्वस्त झाला आहे, असा दावा त्यांनी केला. सध्या तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. गणेश नाईक यांनी स्वतःहून डीएनए टेस्टसाठी पुढे यावे. म्हणजे ज्या महिलेने त्यांच्यावर काही आरोप केले आहेत, त्या महिलेचे मूल त्यांचे आहे की नाही, हे सिद्ध होऊ शकेल. त्यांचे नाव गणेश आहे, पण त्याप्रमाणे ते वागले नाहीत, अशी मल्लिनाथी त्यांनी केली.

Nilam Gorhe
काँग्रेस सोडणे, ही चूकच होती : राष्ट्रवादीला रामराम केलेल्या ज्येष्ठ नेत्याची कबुली

माध्यमांच्या भूमिकेविषयी गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त केली. साहित्य संमेलनात अनेक चांगल्या विषयांवर चर्चा झाली. खूप चांगल्या मांडण्या केल्या गेल्या. मात्र त्यावेळी राज्यात राणांचा बिनपैशाचा नाट्यप्रयोग सुरू असल्यामुळे संमेलनातील विषय मांडायला माध्यमांना जागा मिळाली नाही, असे त्या म्हणाल्या. फोटोग्राफीसारखा उघडपणे जोपासता येणारा छंद उद्धव ठाकरेंना आहे. काहीजणांचे छंद मात्र उघडपणे दाखविता येणारे नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. पत्रकार परिषदेस महिला संघटक विजया शिंदे, स्वाती ढमाले, गणेश सांडभोर, कैलास गोपाळे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com