Bharat Gogawale On Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Bharat Gogawale On Thackeray : ठाकरेंसोबत पुन्हा जाणार का ? गोगावले म्हणतात, "राजकारणात काहीही घडू शकतं..."

Bharat Gogawale On Uddhav Thackeray : "राजकारण असं क्षेत्र आहे, की जिथे कोणीही कायमचा शत्रू नसतो..."

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेनेचे ( शिंदे गट) नेते व मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भरत गोगावले भविष्यात उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर त्यांनी सूचक भाष्य केले आहे. यामुळे आता पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली आहे. या वेळी त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गोगावले पुन्हा जातील, स्वगृही परततील, अशा चर्चा त्यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर होत होत्या. पुन्हा ठाकरेंसोबत जाणार का? या प्रश्नावर गोगावले म्हणाले, "आजच्या परिस्थितीत मी सध्या तरी काही सांगू शकत नाही. मात्र, राजकारणात केव्हाही, काहीही घडू शकतं. आदरणीय नेते बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर नेहमी टीका करायचे. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात काय चित्र घडून आले, हेही लक्षात घ्यावे लागते. राजकारण असं क्षेत्र आहे, की जिथे कोणीही कायमचा शत्रू नसतो, असं सूचकपणे त्यांनी प्रत्युत्तर दिले.

मंत्रिपदाबाबत भाष्य -

मंत्रिपदाच्या पहिल्या यादीतच माझे नाव होते. ९ मंत्री आणि आम्ही ११ दावेदार होतो. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यामुळे मी अजूनही थांबलो आहे. आता मंत्रिपद दिलं तरी आनंदच आहे, नाही दिलं तरी आनंदच वाटणार आहे. आमचे नेते मुख्यमंत्र्यांना कसलाही त्रास होऊ नये, अशी माझी नेहमीची भूमिका आहे, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT