Shivsena- BJP Politics : भाजपची पुन्हा सूडबुद्धीची कारवाई : राघव चड्डांवरील कारवाईनंतर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल

केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Priyanka chaturvedi Latest News
Priyanka chaturvedi Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरून ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काही रेकॉर्डनुसार, बऱ्याच लोकांची मुदत संपली असतानाही ते सरकारी बंगल्यात राहत आहेत. अनेकांना अशी घरे मिळाली ज्यात त्या वर्गात येत नाहीत. एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे ही सत्ताधाऱ्यांची सूडबुद्धी दर्शवते, अशा शब्दांत चतुर्वेदींनी भाजपवर टीका केली आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी शनिवारी संजय सिंह आझाद यांचे वडील आणि त्यांची पत्नी अनिता सिंग यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ईडीने संजय सिंहांवर केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. यावरून केंद्र सरकार दहशतीत असल्याचे सिद्ध होते. या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असा दिलासाही त्यांनी दिला.

Priyanka chaturvedi Latest News
Shambhuraj Desai News : एकही आमदार नसणाऱ्या आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांवरील विधान निंदनीय; शंभूराज देसाईंचा टोमणा

दरम्यान, आम आदमी पक्षाचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांना उच्च श्रेणीतील बंगला देण्यात आला होता. यावरून नवा राजकीय वाद सुरू झाला असताना, आता त्यांना हा बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राघव चढ्ढा यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये टाइप 7 श्रेणीतील बंगला देण्यात आला होता. राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. मार्च 2023 मध्ये सचिवालयाने प्रथमच राघव चढ्ढा यांना टाइप 7 बंगल्याचा हक्क नसल्याचा युक्तिवाद करून वाटप रद्द केले होते.

त्यानंतर आता राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. १८ एप्रिल रोजी अंतरिम जामिनासाठी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात त्यांनी धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने बंगला खाली करण्यास बंदी घातली होती. 7 ऑक्टोबर रोजी पटियाला हाऊस कोर्टाने, चड्ढा बंगल्यावरील पूर्ण हक्क सांगू शकत नाहीत, असं सांगत स्थगिती उठवली.

Edited By- Anuradha Dhawade

Priyanka chaturvedi Latest News
Sunil Tatkare News : तटकरेंचा शरद पवारांवर कटाक्ष; यापूर्वी पक्षात संवादाची भूमिकाच नव्हती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com