Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray Criticizes: मुंबईला दिल्लीपुढे झुकवण्याचं काम सुरू; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर टीका

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारने महाविकास आघाडीतील अनेक विकासकामांना स्थगिती दिली. त्यानंतर हे सरकार केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालत असल्याची टीका ठाकरे गटाकडून सतत होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतील विकासकामांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई पालिकेतील मुदत ठेवी मोडून विकासकामे करण्याचा सल्ला दिला होता.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले होते की, "बँकामध्ये मुदत ठेवी ठेवल्याने कोणताच फायदा होत नाही. हे पैसे खर्च करून जनतेसाठी उयोगात आणता येतील." त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास दुजोरा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारची मुंबई पालिकेवर वक्रदृष्टी असल्याची टीका होत आहे.

मुंबई महानगरपालिकेची (BMC) सुमारे ९० हजार कोटी रुपयांची मुदत ठेवी आहेत. विकासकामांच्या नावाखाली त्या मुदत ठेवी मोडण्याचा घाट राज्य सरकार (State Government) घालण्याचा प्रयत्नात असल्याची टीका ठाकरे गटाकडून होत आहे. त्याचा पुनरूच्चार आज माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींवरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेवर २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने पालिकेच्या मुदत ठेवींची रक्कम वाढवून ती ९० हजार कोटी रुपयांपर्यंत नेली. या ठेवींच्या माध्यमातून मुंबईअंतर्गत होणाऱ्या रस्ते व इतर विकासकामांसाठी उपयोग होतो. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शनसह व शहरात विविध प्रकल्प राबविण्यासाठी मदत होते. आता या मुदत ठेवी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुंबईला पिळून काढण्याचे काम होत आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात मुंबईतील विकासाकामांसाठी आतापर्यंत कधीच राज्य सराकर किंवा केंद्राकडे मदत मागितली नाही. आता मात्र स्थिती बदलली आहे. मुंबईला दिल्लीसमोर झुकविण्याचे, अशक्त करण्याचे काम होत आहे."

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून मोठे व शहराच्या दृष्टीने महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यास मदत होते. त्यातील ३०-४० टक्के निधी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन, पीएफ, ग्रॅच्यूईटी देण्यासाठी वापरला जातो. या ठेवी मनमानीपणे खर्च केल्यास महापालिका अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT