Aaditya Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Worli Assembly Constituency : आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; वरळीत ‘काँटे की टक्कर’

Aaditya Thackeray vs Milind Deora : मुंबईतील विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  

Rajanand More

Maharashtra Assembly Election 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघातील लढत हायहोल्टेज होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाला मैदानात उतरवणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यसभेचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनेही दिले आहे. देवरा यांची उमेदवारी निश्चित मानली जात असल्याने वरळीत तिरंगी लढत होणार आहे.

देवरा हे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. त्यांना लगेच राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता आदित्य ठाकरे यांना टक्कर देण्यासाठी शिंदे यांच्याकडून देवरांना तिकीट दिले जाऊ शकते. असे झाल्यास ठाकरेंसाठी ही लढत सोपी असणार नाही. दुसरीकडे मनसेकडून संदीप देशपांडे रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

आदित्य हे निवडणूक लढणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य ठरले होते. मागील निवडणुकीत त्यांनी वरळीतूनच दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी मनसेकडून उमेदवार दिला गेला नव्हता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. ठाकरेंनी 67 हजार मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळवला होता.

यंदाची निवडणूक ठाकरेंसाठी सोपी नाही. शिवसेना दुभंगली असून मनसेनेही उमेदवार रिंगणात उतरवला आहे. तर शिंदेंकडून देवरा यांच्यासारखा मातब्बर उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो. त्यामुळे आदित्य यांना निवडणुकीत चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. प्रामुख्याने ठाकरे विरुध्द देवरा अशीच लढत होईल. देशपांडे किती मते खेचणार, त्याचा फटका कुणाला बसणार यावर बरेचसे गणित अवलंबून असणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT