Worli Hit And Run Acciden Sarkarnama
मुंबई

Worli Hit And Run Acciden: वरळीतील 'हिट अँड रन' प्रकरणी शिंदे गटातील नेता पोलिसांच्या ताब्यात

Hit And Run Shinde group leader Rajesh Shah police custody: कार चालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. अपघातात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहेत.

Mangesh Mahale

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. याप्रकरणी Hit And Run Case) शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शाह हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. वरळी हिट अॅड रन प्रकरणात त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता. पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण ताजे असताना वरळीतील या घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

वरळी हिट अँड रनची घटना समोर आल्यानं मुंबई हादरली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून कार चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात एका महिलेला तिचे प्राण गमवावे लागेल आहेत.वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य आज सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. दुचाकीवरुन ते परत असताना त्यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली.

यात दोघेही गाडीच्या बोनेटपर पडले. नाकवा यांनी बोनेटवरून रस्त्याच्या बाजूला उडी घेतली, पण त्यांच्या पत्नीला उडी मारता आली नाही, यावेळी चालकाने त्यांना काही अंतरापर्यंत फरफरत नेले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर पांढऱ्या रंगाची बीएमडब्यू (BMW) ही गाडी पोलिसांना सापडली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. बीएमडब्यूवर शिवसेनेचे चिन्ह (धनुष्यबाण) असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT