Zeeshan Siddique Join NCP : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी (ता.25) अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यांच्या या प्रवेशामुळे आता वांद्रे पूर्व मतदारसंघातून आता ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. झिशान यांचे वडील बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता झिशान (Zeeshan Siddique) निवडणुकीला कसं सामोरं जाणार याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. शिवाय ते मागील काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या.
अशातच त्यांनी काल आपल्या एक्स अकाऊंटवर वडील बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यासोबतचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतरचा एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो ट्विट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझा विजय तुमच्या कष्टामुळे आणि तुमचा जो माझ्यावर विश्वास होता त्यामुळे शक्य झालं.
बाबा, मला रोज तुमची आठवण येते. मी नेहमीप्रमाणे तुमच्या सिग्नलची वाट पाहत आहे, जी मी नेहमी पाहात होतो.' असा सूचक मजकूर त्यांनी या ट्विटमध्ये लिहिला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच त्यांच्या आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) प्रवेशामुळे ते निवडणूक लढवणार असल्याचं फिक्स झालं आहे.
झिशान सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष प्रवेशामुळे आता वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचे वरून सरदेसाई आणि झिशान सिद्दीकी यांच्यात लढत होणार आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, 2019 च्या निवडणुकीत इथे काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी विजयी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.