Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : 'तुम्ही हातातलं घड्याळ चोरलं, पण मनगट आमच्याकडेच' ; आव्हाडांकडून अजित पवार लक्ष्य!

Pankaj Rodekar

Sharad Pawar Vs Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटासाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या नावावर शिक्कामोर्तब बुधवारी निश्चित केले आहे. हे नाव 27 फेब्रुवारीपर्यंत वैध राहणार असून राज्यसभा निवडणुकीपुरतेच हे नाव असणार आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा नव्या नावासाठी पर्याय सादर करावे लागू शकतात.

तत्पूर्वी मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णया जाहीर केला होता. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव जाहीर केले आहे. मुळात हा पक्षच शरद पवार यांचा आहे. हे आता नियतीनेही दाखवून दिले आहे. आमच्याकडून तुम्ही पाकीट मारासारखे घड्याळ चोरले पण मनगट आमच्याकडे राहिले, त्यांच्यात दम असेल तर आता त्यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार' असे नाव लावावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर, 84व्या वर्षी शरद पवार यांना जे छळतात त्यांचा बदला जनता घेईल. हम लडेंगे और जितेंगे भी! असा निर्धार ही त्यांनी ठाण्यात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. यावेळी आमदार आव्हाड यांनी शरद पवार यांचा फोटो असलेले नवीन पक्षाचे पोस्टर ही जाहीर केले.

पुढे बोलताना आव्हाडांनी निवडणूक आयोगाचा निर्णय हा दुट्टपी आणि संभ्रम निर्माण करणारा असल्याचे बोलून निवडणूक आयोग खोटे बोलत आहे. ते विरोधाभास दर्शवत आहे. हे निवडणुक आयोग नाही तर कटपुत्तली आहे. असेही म्हटले. शरद पवार यांना राजकीयदृष्टया संपविण्याचा कट रचणारे उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचा आरोपही आव्हाडांनी यावेळी केला. तुम्ही पाकीट मारासारखे घड्याळ चोरले आहे. पण मनगट तोडायला विसरले. ते मनगट शरद पवार यांचे आहे. अशी आठवण करून ते नव्या जोमाने उभे राहतील. असा विश्वास ही आव्हाडांनी व्यक्त केला.

तर, सावली देणाऱ्या वटवृक्षावर यांनी घाव घातला. यात सगळ्यांचा हातभार लागला आहे. ते शरद पवार यांचा राजकीयदृष्टया गळा घोटायला निघाले. पण नियती त्यांना येत्या काळात दाखवून देईल. की शरद पवार काय आहे ते. 84 व्या वर्षी शरद पवार यांना जे छळतात त्यांचा बदला जनता घेईल. हम लडेंगे और जितेंगे भी! असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT