New Delhi : भारतीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह देण्याचा निर्णय काल घेतला. तसेच शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तीन नावांचे व चिन्हांचे पर्याय सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार तीन नावांचे पर्याय आयोगाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. (New name by ECI Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)
शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सुचविण्यात आलेल्या तीनही नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) हे पक्षाचे मूळ नाव कायम ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदराव पवार असे पर्याय सादर करण्यात आले होते.
या तीन नावांपैकी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हे नाव 27 फेब्रुवारीपर्यंत वैध राहणार आहे. राज्यसभा (Rajya Sabha) निवडणुकीपुरतेच हे नाव असणार आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा नव्या नावासाठी पर्याय सादर करावे लागू शकतात. राज्यसभा निवडणुकीत चिन्हाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे चिन्हावर निर्णय घेण्यात आलेला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, पक्षाचे नाव चिन्हाबाबत शरद पवार गटातील नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या. नावामध्ये राष्ट्रवादी किंवा शरद पवारांचे नाव असायला हवे, असा आग्रह नेत्यांनी धरला होता. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शरद पवार नावाचा समावेश असलेली तीन नावांचे पर्यात सादर करण्यात आले होते.
घड्याळ चिन्हही अजित पवार (Ajit Pawar) गटाकडे गेल्याने शरद पवार गटाने आयोगाकडे काही पर्याय सादर केले आहेत. त्यामध्ये वटवृक्ष, उगवता सूर्य या चिन्हांचा समावेश आहे. शरद पवार गटाचा वटवृक्ष चिन्हासाठी आग्रह असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.