Thane Yuva Sena Sarkarnama
मुंबई

Aditya Thackeray : ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या बॅनरला 'जोडे मारो' आंदोलन अन् फोटो जाळण्याचाही झाला प्रयत्न!

Thane Yuva Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची युवा सेना आक्रमक

Pankaj Rodekar

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाणीवपूर्वक खालच्या पातळीवर जाऊन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली असल्याचा आरोप करत, याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेने जोरदार घोषणाबाजी केली.

या वेळी आक्रमक झालेल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्या बॅनरला जोडो मारो आंदोलन केले. एवढच नाहीतर आदित्य ठाकरेंच्या फोटोला लिपस्टिक लावून त्या फोटोंचे तोरणही बनवले आणि ते फोटो फाडून जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो अयशस्वी ठरवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे आणि युवा सेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी युवा सेनेने निषेध आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

या वेळी स्टार प्रचारक राहुल लोंढे यांनी म्हटले की, सत्ता गेल्यापासून उद्धव आणि आदित्य ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे हे उच्च राहणी आणि वाईट विचाराचे आहेत. जे स्वतःला जेंटल समजतात ते मेंटल झाले आहेत. त्यामुळे खासदार संजय राऊत यांची भाषा आदित्य ठाकरे बोलू लागले आहेत. यापुढे अशी वक्तव्यं आदित्य ठाकरे यांनी सुरू ठेवल्यास त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची युवा सेना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असेही लोंढे यांनी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT