MNS Political News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला आहे. ' एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही, असा नरेटिव्ह सेट केला जातोय. नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला आहे.
राजू पाटील यांनी 'एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही, असा नरेटिव्ह सेट केला जातोय . परंतु असं काही नाही ,आजतागायत इतक्या राजकीय घटना घडल्या, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केलाय का? घराच्या शेजारी शपथविधी होता त्यावेळेला सांगितलं नाही. तुम्ही तुमचं राजकारण करा मात्र नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊ नका. आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक निर्णयांपैकी हा एक निर्णय आहे. जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना विचारलं, राज्यसभा असेल विधानसभा असेल अशा वेळेस आम्ही पाठिंबा दिलाय, त्यामुळे असं नाही की आत्ता बिनशर्त पाठिंबा दिलाय,' असंही राजू पाटील म्हणाले.
याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं की, 'ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. आता लवकरच कळेल कोण नकली कोण असली, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही.'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कल्याण-डोंबिवलीत 'काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले, पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत,' असा टोला नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला होता. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच मनसे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार, श्रीकांत शिंदे यंदा हटट्रिक करतील मोठ्या बहुमताने निवडून येतील. 26 एप्रिलनंतर प्रचाराला वेग येणार आहे, त्या अनुषंगाने येत्या 26 तारखेच्या आधी अविनाश जाधव आणि मी मेळावे घेणार आहोत. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना तिकडे आमंत्रित करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले .
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.