मुंबई

दहशतवादी यासिन भटकळच्या पुण्यातील तत्कालीन वकीलाला 'इसिस'कडून धमकी

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी यासिन भटकळचे तत्कालीन वकील जहीरखान पठाण यांना इसिसने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुण्यातील वकील जहीरखान पठाण (ZaheerKhan Pathan) यांना इसिसने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक प्रसाद जोशी यांनी पुण्यातील खडक पोलीस ठाण्यामध्ये तामिळनाडूतील मोहम्मद दाऊद या व्यक्ती विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जहीरखान पठाण हे पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी यासिन भटकळचे तत्कालीन वकील होते. त्यांना इसिसने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मोहम्मद दाऊदच्या वतीने जहीर खान पठाण हे वकील म्हणून काम पाहत आहेत. जहीर खान पठाण यांना धमकावण्यासाठी प्रसाद जोशी या बांधकाम व्यावसायिकाने आयसीस च्या दहशतवादी मौलानाच्या वतीने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अॅड. जहीर खान पठाण यांनी केला आहे.

पठाण यांनी याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. खडक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील खटल्यातून तुम्ही वकील पत्र सोडा नाहीतर तुम्हाला जीवे मारू,'' असे धमकी इसिसने धमकी दिली असल्याचे अॅड. जहीर खान पठाण यांनी पोलिस आयुक्तांना लिहिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

याबाबत अ‍ॅड. पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा न्यायाधीश पुणे, पुणे बार असोसिएशन आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत लेखी अर्जाद्वारे तक्रार दिली आहे. तक्रार अर्जाद्वारे अ‍ॅड. पठाण यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या अ‍ॅड. पठाण जर्मन बेकरी प्रकरणात काम पाहत नाहीत.

अ‍ॅड. पठाण या प्रकरणाच्या तडजोडीच्या निमित्ताने चेन्नई येथे गेले होते. तेथे असताना सचिन टेमघीरे याने संबंधीत व्यक्तीच्यावतीने येथून पुढे माझ्या ऐवजी मौलाना नावाचा माणूस बोलेल सांगितले. त्यानंतर मौलाना नावाच्या व्यक्तीने पठाण यांच्याशी संपर्क साधला. त्याने त्यांना मेसेज करून या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, निघून जा, नाहीतर तुमच्या जीवाचे बरे वाईट करेल अशी धमकी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT