nana patol rahul gandhi Zeeshan Siddique sarkarnama
मुंबई

Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकींचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला; हायकमांड दखल घेणार का?

Pradeep Pendhare

Mumbai News, 13 July : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचे समोर येत आहे. यावर आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेस नेतृत्वाला फटकारत घरचा आहेर दिला आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या नेतृत्वावर प्रशचिन्ह उभे होत असून, हीच आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचे, सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसची (Congress) मतं फुटणार असे सुरवातीपासून निरीक्षण नोंदवले जात होते. मात्र, महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वांकडून काँग्रेसचे सर्व आमदार एकसंघ असल्याचे सांगितले गेले. महायुतीमधील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत होते. परंतु विधान परिषद निकाल समोर येताच काँग्रेसची 8 मतं फुटल्याचे समोर आलं.

आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) काँग्रेसमध्ये असून देखील ते पक्षावर नाराज आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी यांनी या निवडणुकीत मत नेमके कोणाच्या पारड्यात टाकले यावर प्रश्नचिन्ह आहेत. असे असतानाच त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

झिशान सिद्दिकी म्हणाले, "पूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसची (Congress) मतं फुटली होती. तसा पक्षाचा अहवाल आहे. काँग्रेसचे आमदार नाराज आहेत. याची दखल हायकमांडने घेतली पाहिजे". महाविकास आघाडीमधील काँग्रेसची मतं फुटणे हा काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा होतो. तसेच आत्मचिंतन करण्याची वेळ नेत्यांवर आली असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याने ही काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस बाबतीतच, असे का होते? चंद्रकांत हंडोरे यांचा पण निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याने पराभव झाला होता. याची पक्षाने दखल घेतली पाहिजे होती, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

तर या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून मला कोणत्याही बैठकींचे निमंत्रण नव्हते. विधानभवनातील काँग्रेस विधीमंडळ पक्ष कार्यालयात जाऊन पक्ष नेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे मतदान केल्याचा दावा झिशान सिद्दिकी यांनी केली. उमेदवार प्रज्ञा सातव यांचा मोठा विजय त्याचेच द्योतक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT