Vishwajeet Kadam News : 'सांगली'ची मोहीम फत्ते केलेल्या विश्वजीत कदमांची आता थेट काँग्रेसमधील 'या' पदासाठी फिल्डिंग?

Congress Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला. सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कामगिरी उंचावलेली असताना पुण्यात मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरे जावं लागलं
Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला. सबंध महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कामगिरी उंचावलेली असताना पुण्यात मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरे जावं लागलं. या पराभवानंतर आता पुणे शहरात संघटनात्मक बदल करण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

आगामी विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस (Congress) पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडे केली आहे.

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, माजी मंत्री रमेश बागवे,दत्ता बहिरट, चंदू कदम, अविनाश बागवे, जयंत किराड, साहिल केदारी, नुरद्दीन इनामदार, रमेश अय्यर, विजय खळदकर, विशाल मलके आदींच्या शिष्टमंडळाने चेन्निथला तसेच बाळासाहेब थोरात आदींची मुंबईत भेट घेतली.

Vishwajeet Kadam
Jayant Patil : मी बेसावध राहिलो; पण काँग्रेसची दुसऱ्या फेरीची मतं समान वाटायला हवी होती; पराभवानंतर जयंत पाटलांची खंत

लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्षसंघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज आहे.' असं या शिष्टमंडळातून सांगण्यात आलं.

यावेळी पक्षातील वरिष्ठांनी शहराध्यक्षपदासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे. असं विचारलं असता माजी नगरसेवक राहिलेल्या चंदू कदम यांचं नाव पुढे केला आहे. चंदू कदम हे दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांचे चुलत भाऊ आहेत.

विश्वजीत कदम यांनीच या शिष्टमंडळाला पक्षी श्रेष्ठींकडे शहराध्यक्ष बदलाची मागणी करण्यासाठी पाठवल असल्याचे बोलले जात असून चंदू कदम यांच्यासाठी विश्वजीत कदम फील्डिंग लावत असल्याचं देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Vishwajeet Kadam
Pankaja Munde : 'यह सिर्फ झांकी है, आता विधानसभा बाकी'; पंकजा मुंडेंनी यशाचं गणित उलगडलं !

काँग्रेस शहराध्यक्ष बदलांच्या चर्चा सुरू झाल्यानंतर शहरातील अन्य इच्छुकांनी देखील आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आबा बागुल, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, गोपाळ तिवारी ,मुख्तार शेख, सुनील मुदगल यांची नावे समोर आली आहेत.

दरम्यान शिष्टमंडळाकडून करण्यात आलेला आरोपांची शहानिशा काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येणार आहे. आरोपात तथ्य आढळल्यास पुणे शहराध्यक्ष बदलाच्या विचार केला जाऊ शकतो. मात्र, विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने राहिले असताना शहराध्यक्ष बदलण्याची रिस्क घेणार का हे पाहावं लागेल.

Vishwajeet Kadam
Assembly Election 2024 : महायुती की महाविकास आघाडी, विधानसभेला जनतेचा कौल कुणाला? मोठा सर्व्हे समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com