Ajit Pawar, Baba Siddique, Zeeshan Siddique Sarkarnama
मुंबई

Zeeshan Siddique News : अजित पवारांसोबत आमचे जुने संबंध; कौतुक करत सिद्दीकी पिता-पुत्रांचा सूचक इशारा!

Zeeshan Siddique Reply Sanjay Raut : ठाकरे गट आणि सिद्दीकी पिता-पुत्रांमध्ये आरोप-प्रत्यारोप...

Jui Jadhav

Mumbai Politics Latest News :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. यावर आमदार झिशान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यासोबतच सूचक वक्तव्यही केले आहे. झिशान सिद्दीकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत.

मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. माझा इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. वडिलांचा काय निर्णय आहे ते तुम्ही त्यांनाच विचारा. माझा असा कुठलाही विचार नाही आणि कुठली चर्चाही झालेली नाही. अशा चर्चा ऐकून मीच चकित झालो. या बाबत वडिलांशी कुठलेही चर्चा झालेली नाही, असे Zeeshan Siddique म्हणाले.

अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आमचे कौटुंबीक संबंध आहेत. अनेक वर्षांपासूनचे आमचे संबंध आहेत. आम्ही महाविकास आघाडीतही सोबत होते. अडचणीत असताना अजितदादांनीच मला मदत केली होती. युवकांनाही त्यांचे फार सहकार्य असते. दादा अर्थमंत्री आहेत. यामुळे माझी त्यांची नेहमी भेट होत असते. ते सर्वांना समजून घेतात, असे म्हणत झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांची स्तुती केली. अजितदादा हे चांगले नेते आहेत. तरुणांना कायम सहकार्य करतात. ते चांगले नेते असल्याने त्यांचे मी जाहीरपणे कौतुक करतो, असे झिशान म्हणाले.

यावेळी झिशान यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. तुम्ही आघाडीत असतानाही आपल्या मित्र पक्षातील विद्यमान आमदाराबद्दल वक्तव्य करता, हे दुर्दैवी आहे. याधीही त्यांनी मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्याबद्दल वक्तव्ये केली आहेत. शिवसेनेच्या नेत्याकडून होत असलेली वक्तव्ये ही पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. अशा वक्तव्यांची वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

माझ्याबद्दल कोण काय बोलले आहे, याची कल्पना नाही. पण त्याची माहिती नक्कीच घेईन. कारण यात काहीही तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात कायमच संघर्ष करावा लागतो. तसा पुढेही करतच राहू. सामन्यांच्या प्रश्नासाठी लढत राहू, असे झिशान सिद्दिकी यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबा सिद्दीकी हे अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. तसेच बाबा सिद्दीकी हे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांवर राऊत यांनी टीका केली. तिथल्या मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. बाबा सिद्दीकींना समाज आणि देश माफ करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भविष्यातले काहीही सांगू शकत नाही. पण आता असे काही नाही. अजित पवारांसोबतचे आमचे संबंध हे 30 वर्षांपासूनचे आहेत. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे या सर्वांशी आमचे संबंध आहेत. हे संबंध पक्षीय राजकारणाच्या पलिकडचे आहेत, असे बाबा सिद्दीकी म्हणाले.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT