Maharashtra Political News : राज्यातील राजकीय घडामोडीना पुन्हा एकदा वेग येणार आहे. मुंबई काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षही फुटाण्याच्या मार्गावर आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यतील दोन मोठे राजकीय पक्ष फुटले. आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. मात्र त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडायला सुरुवात झाली. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसचा पहिला आमदार फुटण्याची चिन्ह दिसून येत आहेत. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात जाण्याची चर्चा सुरू आहे.
आता राज्यात वेगळे गणित
आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात वेगळे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सत्तेत येण्यासाठी विरोधक आहेत, तेच आता सत्ताधारी पक्षांमध्ये सामील होताना पाहायला मिळत आहे. आधी एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि मग त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. आता काँग्रेसमधूनही आमदार बाहेर पडायला सुरुवात झाली आहे.
2024 च्या निवडणुकीमध्ये नेमके कोण, कुठल्या पक्षात आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिद्दीकी पितापुत्र हे अजित पवार गटात सामील होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय गणिते जुळताना राज्यात पाहायला मिळत आहेत. मात्र सिद्दीकी पितापुत्र हे अजितदादा गटात का जात आहेत, त्याचे कारण अद्यापही स्पष्ट नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईडीच्या भीतीपोटी निर्णय?
काँग्रेस नेते आणि वांद्रे पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या मुंबईतील निवासस्थानावर तसेच अनेक कार्यालयांमध्ये ईडीने छापे मारले आहेत. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. वांद्रे येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बनावट कंपनी बनवून 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बांधकाम व्यवसायिक रफीक मकबूल कुरेशी यांच्यावर आहे. या आरोपांच्या संदर्भात ईडीने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. ईडीने रफीक मकबूल कुरेशी यांच्या घरावरदेखील छापा मारला आहे. घरातून पेमेंट संदर्भात अनेक महत्त्वाची कागदपत्रे ईडीला मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.