Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Birthday : 'मातोश्री'च्या अंगणातही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं 'झिरो सेलिब्रेशन'

Matoshri And Uddhav Thackeray : यंदा 'मातोश्री'चा नूर पालटल्याची चर्चा

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस.. मात्र इर्शाळवाडी दुर्घटना अन् राज्यातील पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत यंदा वाढवदिवस साजरा न करण्याचेच ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यामुळं राज्यात धडाक्यात 'सेलिब्रेशन' होणार नाही हे ठरलेलंच होतं. मात्र 'मातोश्री'वरही साधेपणातही ठाकरेंच्या वाढदिवस साजरा झाला नाही. यंदा ठाकरेंच्या वाढदिवसाचं 'झिरो सेलिब्रेशन' ठरलं. (Latest Political News)

दोन-पाच नव्हे तर तब्बल २८ वर्षांना मातोश्रीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं होतं. पण ते जेमतेम अडीच वर्षातच गेलंही... ५० वर्षांची शिवसेना फुटली अन् एकाच झटक्यात ४० आमदार ठाकरेंना सोडून गेले. गावोगावचे शिलेदार (शिवसैनिक) हातातून निसटले...

याच पडझडीत त्यांच्याकडून शिवसेनेचं नाव अन् 'धनुष्यबाण'ही हिरावला! अशा डझन-दीड डझन संकटांनी ठाकरेंना घेरलं. राज्यातच नाही तर संबंध देशात धाक ठेवलेल्या 'मातोश्री'चा नूर पालटला अन् नेतृत्वच 'बॅकफूट'वर आलं.

वर्षभरात कधी नव्हं त्या एकानंतर एक अशा मोठ्या संकटांचा सामना करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस होता. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये धडाकेबाज सेलिब्रेशन पाहिलेल्या 'मातोश्री'वरही ठाकरेंचा वाढदिवस साजरा झाला नाही.

पाऊस आणि इर्शाळवाडी घटनेमुळं वाढदिवस साजरा झाला नसल्याचं सांगण्यात येतंय. मात्र असं असलं तरी 'मातोश्री'वर छोटेखानी ते होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र घरीही ठाकरेंचा 'बर्थ डे' खरोखरीच साधेपणानंही साजरा झालेला नाही. परिणामी यंदा ठाकरेंच्या वाढदिवसाचं 'झिरो सेलिब्रेशन' झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT