Sadabhau Khot, Praveen Darekar, Prasad Lad, Vinayak Mete
Sadabhau Khot, Praveen Darekar, Prasad Lad, Vinayak Mete sarkarnama
मुंबई

खोतांचा पत्ता कट होणार; मेटेंनाही धाकधूक : पंकजा, बोंडे विधान परिषदेवर शक्य

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यसभेपाठोपाठ या निवडणुकीचीही धामधूम सुरू होणार आहे.

सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते, (शिवसेना) प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (सर्व भाजप) संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील.

महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे चार या प्रमाणे नव्या रचनेनुसार आमदार निवडून येतील. भाजपकडून विद्यमान सदस्यांत खोत यांचे नाव येण्याची शक्यता सर्वाधिक कमी आहे. ठाकूर हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी इतरांना संधी मिळू शकते. भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी प्रवीण दरेकर यांचे पद निश्चित मानले जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी म्हणून लाड यांचाही फेरविचार होऊ शकतो. नव्या सदस्यांत भाजपकडून पंकजा मुंडे, कृपाशंकरसिंह, माजी मंत्री अनिल बोंडे यांना संधी मिळू शकते. विनायक मेटे मात्र गॅसवर राहू शकतात. त्याऐवजी इतर नेत्यांना भाजप संधी देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेत पाठोपाठ आता विधानपरिषदेचीही निवडणूक होत असल्याने अनेक राजकीय घडामोडींची शक्यता आहे. राज्यसभेतील तडजोडीचे पडसाद या निवडणुकीत उमटू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT