Santosh Bangar, Deepak Kesarkar
Santosh Bangar, Deepak Kesarkar Sarkarnama
मुंबई

Santosh Bangar News : मंत्री केसरकरांचा संतोष बांगरांना गर्भित इशारा, म्हणाले,''आमदार आहे म्हणून कारवाई...''

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar On Santosh Bangar : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या आक्रमक स्वभावामुळं कायमच वादाच्या भोवर्यात सापडले जातात. आता एकदा पुन्हा बांगर यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हिंगोली येथील महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीच्या घटनेवर राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.

आता शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी आमदार बांगराना या मारहाणीच्या घटनेवरुन गर्भित इशारा दिला आहे.

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. केसरकर म्हणाले, मारहाणीचं प्रकरण घडलेलं असेल तर गृहविभाग त्यावर नक्की कारवाई करेल. आम्हाला आमदार आणि इतर सर्व सारखेच आहेत. मात्र, बांगर साहेबांशी चर्चा करू. त्यांनी संयम राखला पाहिजे. सरकारची इमेज राखली पाहिजे. बांगर हे अॅग्रेसिव्ह आहेत. कॉस्टसाठी भांडत असतात. पण कुठलाही कॉल असेल तरी मारहाण झाली नाही पाहिजे. ते आमदार आहेत म्हणून कारवाई होणार नाही असं त्यांनी समजू नये. मात्र, लोकांवर अन्याय झाला की, शिवसैनिक पेटून उठतो कदाचित तसं असेल असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) वेळी म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यापद...

ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्यावरुन गंभीर आऱोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी बोलावं, खात्री करून घ्यावी.

जगभरातील लोक दावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला असं होत नाही. त्यामुळे त्यांचे आरोप हास्यापद आहे. टीका करण्यापूर्वी थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडं शांत व्हा. असा टोलाही केसरकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

पुन्हा एकदा बांगर अडचणीत...

शिंदे गटाचे नेते व आमदार संजय बांगर हे वादांमुळे कायमच चर्चेत असतात. अधिकार्यांना अर्वाच्च भाषेत शिवागीळ, मारहाण, यामुळे अनेकदा ते स्वत: अडचणीत आलेत आणि पक्षालाही अडचणीत आणलं आहे. आता पुन्हा ते एकदा ते वादात सापडले आहेत.

बांगर हे हिंगोली शहरालगत असल्यास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात बांगर यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार बांगर यांचे यापूर्वीचे वाद...

शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांची मुलं अविवाहित मरतील,गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा अशी वादग्रस्त विधानं, मध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण, विमान कंपनी कार्यालयात तोडफोड, कृषी अधिकाऱ्याला धमकावणं, ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ, आता प्राचार्याला कार्यकर्त्यांसह मारहाण अशा विविध प्रकरणात बांगर हे अडचणीत आले होते. यानंतर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिली होती. आता केसरकर यांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT