Political differences within Sharad Pawar led NCP Sarkarnama
नगर

'लेकीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणार नाही; जितेंद्र आव्हाडांची निष्ठा शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच, डिलिमिटेशनवरून पक्षात खदखद!

NCP party stand on Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे संविधानाशी प्रतारणा असल्याची नताशा आव्हाड यांची भूमिका; जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील, त्याबरोबर राहणार.

Pradeep Pendhare

Maharashtra politics latest news on Delimitation Bill: डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणे म्हणजे, देशाशी आणि देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे, असा घणाघात करत नताशा आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने या बिलाला पाठिंबा देण्यापूर्वी विचार करावा असा बेधडक सल्ला दिला होता.

नताशा आव्हाड यांच्या भूमिकेवरून, महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेष करून शरद पवार राष्ट्रवादीत एकच गदारोळ झाला. नताशा यांच्या या भूमिकेवर त्यांचे वडील, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांची काय भूमिका असेल, याकडे लक्ष लागले होते. आता जितेंद्र आव्हाड यांची देखील भूमिका समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देत असल्याचे वृत्त समोर येत आहेत. तशा चर्चांना देखील जोर पकडला आहे. यावर पक्षांतर्गत खदखद समोर येऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा यांनी या बिलाला पाठिंबा देणे म्हणजे, संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे होईल, अशी समाज माध्यमांवर भूमिका व्यक्त केली.

नताशाने डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाने पाठिंबा देण्याच्या शक्यतेवर 'एक्स' (Twitter) वर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले की, मुलीचे मत वेगळे असू शकते, पण शरद पवार यांच्याबद्दलची निष्ठा ठाम आहे आणि शरद पवार हे कधीही कोणाच्या बोलण्यावर बंधन आणत नाहीत. भाजपला (BJP) राजकीय फायदा मिळवून देण्याचा हा एक प्रकारे घटनाबाह्य आणि सुनियोजित प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

नताशा यांच्या भूमिकेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येणार नाही. पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नताशा आव्हाड यांनी डिलिमिटेशन बिलाबाबत घेतलेल्या निर्भीड आणि स्पष्ट भूमिका ही तिची आहे. पण आपली निष्ठा शरद पवार साहेबांबरोब आहे, असे म्हटले आहे. नताशा लोकशाही मानणारी आहे. नताशा जे काही म्हणते आहे त्यामागे तिचा विचार आहे. ती वाचन करुनच बोलते. शरद पवार तिला बोलू देऊ नको वगैरे ते काहीही सांगणार नाहीत. तिला ओरडू नकोस हेच सांगतील मला शरद पवार यांचा स्वभाव माहीत आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

काँग्रेसची भूमिका काय आहे.....

काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच या बिलाला विरोध करत आहे. महिला आरक्षणाचे स्वागत असले तरी, डिलिमिटेशनच्या नावाखाली लोकसभेच्या रचनात बदल करून विशिष्ट राज्यांना फायदा मिळवून देण्याचा आणि विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा प्रयत्न स्वीकारार्ह नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT