Vijay Auti, Nilesh Lanke sarkarnama
नगर

Nagar News : आमदार लंकेंचे राजकीय टायमिंग; कट्टर प्रतिस्पर्ध्याला दिल्या शुभेच्छा...

Pradeep Pendhare

Nagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून नाव चर्चेत आहे. आमदार लंके यांनी या चर्चेचे खंडण केले नसले,तरी ते चर्चेत राहण्यासाठी पुरेपुर संधी साधत आहेत.पारनेर मतदारसंघात ज्यांचा पराभव केला,असे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसाचे टायमिंग साधत आमदार लंकेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आमदार नीलेश लंके यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर विजय औटी यांच्याबरोबरचा एकत्रित असलेला जुना फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र असल्याचा टायमिंग आमदार लंके यांनी यातून साधण्यात यशस्वी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेत. पुढील महिन्यात कधीही आचारसंहिता लागू शकते. यातच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.

नगर दक्षिणची जागा ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत. या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची चर्चा आहे. पण त्याची निश्चिती अजून पक्षांकडून झालेली नाही. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत असून, त्यावर अजून शिक्कामोर्तब नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार गटाकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे.

आमदार लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांच्या माध्यमातून नगर दक्षिण मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेची दखल विखे यंत्रणेने घेतली होती. आता शिवपुत्र संभाजी हे महानाट्याचे आयोजन नीलेश लंके प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. हे महानाट्य खासदार अमोल कोल्हे हे एक ते चार मार्च दरम्यान सादर करणार आहेत.

यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५० हजार पास वितरणाचे नियोजन आहे. यातून आमदार लंके हे पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या चर्चेस्थानी आले आहेत. हे करताना त्यांनी त्यांच्याविरोधकांची मोट देखील बांधत आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघातील कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय औटी यांना देखील काही दिवसांपासून जवळीक वाढवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाविकास आघाडीचे सरकार असताना बाजार समितीत देखील औटी आणि लंके यांचे सूर जुळले होते. तेव्हापासून मतदारसंघात औटी-लंके ही समझोता एक्स्प्रेस सुसाट आहे. माजी आमदार औटी यांचा वाढदिवसाचे टायमिंग साधत आमदार लंके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार लंके यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर दोघांचा जुना फोटो आमदार लंके यांनी शेअर केला आहे. आमदार लंके हे राजकीय टायमिंग पुन्हा लोकसभेच्या अनुषंगाने चर्चेत आले आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT