Nilesh Lanke News : 'नगर दक्षिण'साठी आमदार लंकेंचे "महानाटक"!

Ahmednagar Politics : यातच हे नाटक शरद पवार गटात असलेले खासदार अमोल कोल्हे हे सादर करणार आहेत.
Nilesh Lanke News
Nilesh Lanke News Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आमदार नीलेश लंके (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चाचपणीचा प्रयोग हाती घेतला आहे. यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या अभिनयाने सजलेले "शिवपुत्र संभाजी" या महानाटक नीलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन केले आहे. मुंबई येथे नीलेश लंके प्रतिष्ठानचा वर्धापनदिनातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता आमदार लंके यांनी नगरमध्ये "शिवपुत्र संभाजी" या महानाट्याचे आयोजन केले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महानाटकाचे ५० हजार पासेस वितरित करून या महानाट्याचा प्रयोग यशस्वी करण्याचे नियोजन नीलेश लंके प्रतिष्ठानने केले आहे. यातच हे नाटक शरद पवार गटात असलेले खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सादर करणार आहेत. आणि आयोजक अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे आहेत. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाजप इच्छुक असलेल्या अनेकांच्या, विशेष करून विखे यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत.

Nilesh Lanke News
Nilesh Lanke : नेत्यांचा आदेश आल्यास यशस्वी करणार; आमदार लंकेचे 'नगर दक्षिण' बाबत मोठे विधान

विशेष म्हणजे, आमदार लंके (Nilesh Lanke) राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार( गटाकडे गेले असले, तरी ते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चांगले संबंध ठेवून आहेत. याशिवाय शरद पवार गटाकडूनही नगर दक्षिण लोकसभेबाबत आमदार नीलेश लंके यांचे नाव लावून धरण्यात आले आहे. ही जागा भाजपकडे असल्यामुळे अजित पवार गटाने ही ह्याजागेबाबत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हे महानाट्य नगर दक्षिण लोकसभेसाठी वेगळाच राजकीय रंग भरणार असल्याचे दिसते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नीलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने १ ते ४ मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता नगर शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत आहे. बारा वर्षांपूर्वी नगर शहरात जाणता राजा हे महानाट्य झाले होते. त्यानंतर आता शिवपुत्र संभाजी हे महानाटक होत आहे. मात्र, या महानाट्याच्या प्रयोगाचा राजकारणाशी संबंध जोडू नये, असेही आमदार लंके यांनी म्हटले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाने हे औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत.

शंभू चरित्राचा वेध घेणारे शिवपुत्र संभाजी हे एकमेवाव्दितीय महानाटय २ तास ४० मिनिटांचे आहे. महानाटयामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पाहावयास मिळणार आहे. महानाटयासाठी १५० फूट लांब, ८० फुट रूंद तसेच ५ मजली किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृतीचा ६७ लाख रूपयांचा सेट लावण्यात येणार आहे. महानाट्यासाठी २० लाख रूपयांची आकर्षक, राजेशाही ड्रेपरी, ४ लाख रूपयांची शस्त्रास्त्रे आणि युध्द साहित्य वापरण्यात येणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Nilesh Lanke News
Ashok Chavan : एकदा CM अन् आता राज्यसभेची संधी हुकली, तरीही राणेंनी अशोक चव्हाणांना केला फोन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com