Ahmednagar News Sarkarnama
नगर

Ahmednagar Two Group Clashes: छत्रपती संभाजीनगरनंतर अहमदनगरमध्ये दोन गटांत तुफान राडा; पोलिसांची धरपकड सुरु

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन गटात तुफान राडा झाला होता. यानंतर उफाळलेल्या हिंसाचारात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेवरुन राज्याचं राजकारणही ढवळून निघालं होतं. तसेच सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावरही ताशेरे ओढण्यात आले होते. आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नंतर अहमदनगरमध्येही दोन गटात भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर(Ahmednagar)मधील गजराजनगर परिसरात मंगळवारी (दि.४) रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. मात्र, या वादामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेमध्ये काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात काहीवेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू केलं आहे.

वारुळवाडी रस्त्यावर दोन गटांमध्ये किरकोळ वादातून बाचाबाची सुरू झाली. नंतर या वादाचं रुपांतर तुफान दगडफेकीमध्ये झालं. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार सुरू झाला. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी परिसरात उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल जाळून टाकल्या. तसेच, चारचाकी कारचीही तोडफोड केली.

या दगडफेकीच्या घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या वादामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गजराजनगर, मुकुंदनगर आणि वारुळवाडी परिसरात पोलीस(police) बंदोबस्त तैनात केला.

याप्रकरणी पोलिसांनी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करत 10 ते 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले असून त्यांना नगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखण्यात यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT