Navneet Rana, Anandrao Adsul, Bhavna Gawali sarkarnama
नागपूर

Loksabha Election 2024 : नवनीत राणांच्या भाजप प्रवेशावर अडसूळांचा टोला; म्हणाले, चोर रात्रीच्या अंधारातच येतात...

Anandrao Adsul जेव्हा उमेदवारी द्यायची नसते तेव्हा सर्व्हेचे कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते असे मत अडसूळ यांनी व्यक्त केले.

सरकारनांमा ब्यूरो

Nagpur News : नवनीत राणा यांचा नागपुरात मध्यरात्री भाजपमध्ये प्रवेश घेण्यात आला. यावरून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपवर सडेतोड टीका केली आहे. अडसूळ म्हणाले, ज्यावेळी उमेदवारी द्यायची नसते तेव्हा सर्व्हेचे कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते. चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाई गडबडीने येतात, असे सांगत यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवनीत राणा मध्यरात्री नागपुरात येऊन पक्षप्रवेश करतात, याबद्दल शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाई गडबडीने येतात. एवढेच नाही तर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळेल.

अमरावतीमधून नवनीत राणा विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का, या प्रश्नावर ही आनंदराव अडसूळ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करायचा की नाही हे अजून ठरवलेलं नाही. अजून दोन-तीन दिवस वाट पाहणार आहोत. कारण न्यायालयाचा निर्णय यायचा आहे. त्यावर सर्व अवलंबून राहिल.

जे घडायचे असते ते कधीही घडू शकते. घाई केली (नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश) म्हणून ते कायम राहतीलच असं नाही, असेही अडसूळ म्हणाले. दरम्यान, शिवसेनेच्या जागा मिळवण्यासाठी भाजपने खोट्या सर्वेक्षणाचा आधार घेतलाय का, या प्रश्नावर अडसूळ यांनी माझ्या बाबतीत शक्यतो असे घडलेले नाही. मात्र, या आरोपांबद्दल मी ही ऐकले आहे. त्यात किती तथ्य आहे हे मला माहीत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जेव्हा उमेदवारी द्यायची नसते तेव्हा सर्व्हेचे कारण सांगून उमेदवारी नाकारली जाते, असेही अडसूळ यांनी स्पष्ट केले. यवतमाळ वाशीममध्ये भावना गवळी याच उमेदवार राहणार आहेत, असे सांगून कदाचित उद्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात, अशी माहिती अडसूळ यांनी दिली.

Edited By : Umesh Bambare

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT