Navneet Rana : मध्यरात्री नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश, बावनकुळेंची मात्र एका गोष्टीवरून नाराजी

BJP Politics : अमरावती भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर त्यांनी भाजप प्रवेश घेतला.
Bachchu Kadu, Anandrao Adsul, Chandrashekhar Bawankule and Navnit Rana
Bachchu Kadu, Anandrao Adsul, Chandrashekhar Bawankule and Navnit Rana Sarkarnama

Amravati Loksabha Election 2024 : युवा स्वाभिमानचा राजीनामा देत खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे अर्ज दाखल करणे सुरू होणार आहे.

तत्पूर्वी त्यांनी बुधवारी (ता.२७ मार्च) रात्री नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला त्यांचे पती तसेच युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष व आमदार रवी राणा यांची उपस्थिती होती. पण, त्यांच्या खांद्यावर मात्र युवा स्वाभिमानचा दुपट्टा कायम होता.

अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पहिला पक्षप्रवेश मग तिकीट असा प्रकार मात्र नवनीत राणा यांच्याबाबत झाला.

पहिले लोकसभेचे तिकीट, मग घेतला भाजप प्रवेश असे का झाले, असा प्रश्न पत्रकारांनी राणा यांना विचारला. त्यावर नवनीत राणा यांनी असे काही उलट झाले नाही, सगळे सरळ झाले असे उत्तर पत्रकारांना दिले.

Bachchu Kadu, Anandrao Adsul, Chandrashekhar Bawankule and Navnit Rana
Sanjay Kakade News : काही काय..., काकडेंच्या फेसबुक पोस्टमुळे मोदी, शाह अन् फडणवीस 'अण्णां'ची उमेदवारी कापणार?

बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि भाजप (BJP) अंतर्गत विरोध हा मोदी यांची 400 पार ची घोषणा पाहता मावळला आहे. बच्चू कडू हे एनडीएचे घटक आहेत असे म्हणत त्यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले, तर अमरावती भाजपअंतर्गत विरोध हा आता मावळला असून, पक्षात प्रवेश आणि तिकीट मिळेस्तोवर तो विरोध होता. आता मात्र विरोध नसल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा विरोध होता तर त्यावर एनडीएतील नेते त्यांच्यासोबत बोलतील, असे राणा यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात जात प्रमाणपत्राबद्दल निकाल प्रलंबित असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत निकाल लागला नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले. 1 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती आहे.

अमरावती येथून 4 एप्रिल रोजी नामांकन नवनीत राणा यांचे अर्ज दाखल करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला. युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांना दिलेल्या राजीनाम्यात नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा तसेच प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

नवनीन राणा यांच्या नागपूर येथील भाजप पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार रवी राणा यांच्या खांद्यावर असलेला युवा स्वाभिमानचा दुपट्टा कशासाठी असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला.

तर त्यावर नवनीत राणा यांनी ते युवा स्वाभिमानचे नेते असल्याने तो आहे असे म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावर बावनकुळे यांनी रवी राणा यांनीदेखील आजच भाजप प्रवेश का घेतला नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.

R

Bachchu Kadu, Anandrao Adsul, Chandrashekhar Bawankule and Navnit Rana
Loksabha Election 2024 : लोकसभेला एकही जागा न मिळाल्याने 'आरपीआय'ची उद्याची पुण्यातील बैठक वादळी होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com