नागपूर

ठरल्याप्रमाणे ओबीसी महासंघाने आज राज्यभर केली निदर्शने...

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नुकताच मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज ओबीसी महासंघाने राज्यभर निदर्शने करून सरकारला निवेदन पाठविले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने भारतीय संविधानाच्या कलम २४३ (ड) (६) आणी कलम २४३ (ट) (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरीषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतध्ये ओबीसी संवर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अथवा २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करण्यात यावी. म्हणजे नेहमीसाठी हा प्रश्न सुटेल. सर्वोच्च न्यायालयाने जी ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा आखून दिली आहे, ती केंद्र सरकारने हटवावी जेणेकरुन ओबीसींना पूर्णतः न्याय मिळेल.

केंद्र सरकारने ओबीसींची २७ टक्के पदभरती करून रोहिणी आयोग लागू करावा. केंद्र सरकारने ओबीसींना पदोन्नतीचा लाभ द्यावा व तशी घटनादुरुस्ती करावी, या व ईतर प्रमुख मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हा कचेरीसमोर अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात निदर्शने करून निवेदन पाठविण्यात आलीत. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने पार पडली व केंद्र सरकारला जिल्हाधिका-यांच्या माध्यमातून निवेदने सोपविण्यात आली.

यावेळी ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. बबनराव फंड, बबनराव वानखेडे, ॲड. टेमुर्डे, प्रा. सुर्यकांत खनके, अनिल शिंदे, प्रा. नितिन कूकडे, रवि वरारकर, रणजित डवरे, विजय मालेकर, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदू नागरकर, पारस पिंपळकर, संजय सपाटे, अशोक पोफळे, बबनराव राजुरकर, डॉ. संजय बर्डे, प्रा. जोत्सना लालसरे, प्रवीण जोगी, रवि जोगी, नितिन खरवडे, रजनी मोरे, विद्या शिंदे, मंजुळा डुडुरे, गणपती मोरे, बादल बेले, रवी टोंगे, नितिन खरवडे, कुणाल चहारे, तुळशिदास भुरसे, गणेश आवारी, अंकुश कौरासे, भुवन चिने, नामदेव मोरे, शाम लेडे, देवराव दिवसे, बोढे, प्रदिप पावडे, फूलझेले, ईटनकर, विठोबा पोले, राजु निखाडे, चंदू महात्मे, वसंता भोयर, योगेश्वर बोबडे, रामराव हरडे, गजानन अगडे, रविन्द्र ऊरकूडे, संजय बुरांडे, राजकुमार नागापुरे, निलेश चालुरकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज उपस्थीत होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT