Vanita Raut sarkarnama
नागपूर

Loksabha Election 2024 : 'गाव तिथे बार अन् आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की...'; महिला उमेदवाराचं आश्वासन चर्चेत

Chandrapur Loksabha चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे.

Umesh Bambare-Patil

Chandrapur Loksabha News : सध्या लोकसभेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्येकजण विकासाच्या गप्पा मारून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. पण, चंद्रपूर लोकसभेच्या महिला उमेदवाराने अनोखे आश्वासन लोकांना दिले आहे. या लोकसभेत मी विजयी झाल्यास 'गाव तिथे बार' अन् आनंदाच्या शिधासोबत व्हिस्की अन् बिअर देणार असे जाहीर केले आहे. त्यामुळे या महिला उमेदवाराचा अजेंड्याची राज्यात चर्चा रंगली आहे.

चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. यात काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र, सध्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकास कार्याचे आश्वासन घेऊन नेते जनतेसमोर उभे होतात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गाव तिथे बिअर बार उघडू. बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत.

चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे. यामध्ये सध्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांचीच चर्चा रंगली आहे. अनेक उमेदवार विविध विकासकामांची आश्वासने घेऊन नेते जनतेसमोर जातात. याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत.

त्यांनी चक्क 'गाव तिथे बिअर बार' उघडू तसेच बेरोजगारांना बिअर बारचे परवाने देऊ, असे आश्वासन त्या देत आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर खासदार निधीतून दारिद्र्यरेषेखालील लोकांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की, बिअर देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या या आश्वासनाला मतदार किती आकर्षित होतात हे बघणे उत्सुकतेचे आहे.

वनिता राऊत या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर येथून २०१९ ची लोकसभा, २०१९ मध्ये चिमूर विधानसभा निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असून, त्यांनी येथील दारूबंदी उठवून ठिकठिकाणी दारूची दुकाने उघडण्यात यावीत, अशी मागणी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गाव तिथे दारूचे दुकान असे त्यांचे धोरण असून, समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणे ही फार मोठी चूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारूसाठी प्रसिद्ध आहे. बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याऐवजी ही महिला उमेदवार थेट बिअर बारचा परवाना देणार आहे, असे आश्वासन देत फिरत असल्याने मतदारांमध्ये या महिला उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Umesh Bambare

R.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT