Uddhav Thackeray Sarkarnama
नागपूर

Nagpur Politics : नागपूर महापालिका पराभवानंतर उद्धव सेनेचे मोठे ऑपरेशन; जिल्हाप्रमुख बदलला

Nagpur Municipal Corporation election UBT Shivsena : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने पक्षात काही फेरबदल केले आहेत.

Rajesh Charpe

Nagpur Politics : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उद्धव सेनेने संघटनेत मोठे ऑपरेशन केले. निष्क्रिय प्रमोद मानमोडे यांची जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना शहरातून बाहेर टाकले. याशिवाय आपसातील भांडणे टाळण्यासाठी कुमेरिया यांना महानगर प्रमुख करून एकाच व्यक्तीकडे समन्वय ठेवला आहे.

या पूर्वी कुमेरीया आणि मानमोडे असे दोन जिल्हा प्रमुख आणि तीन शहर प्रमुख शहरात शिवसेनेने नेमले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये आपसात भांडणे आणि स्पर्धा लागली होती. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्हा प्रमुखांनी दक्षिण नागपूर या एकाच मतदार संघावर दावा ठोकला होता. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात दोन्ही जिल्हा प्रमुख एकमेकांच्या बैठका, कार्यक्रमांना जात नव्हते. संपूर्ण महापालिकेच्या निवडणुकीत मानमोडे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. पक्षाकडे प्रस्ताव पाठवण्याचा अधिकार कोणाला यावरूनही त्यांनी संपर्क प्रमुख यांच्याशी वाद घातला होता. त्यांच्या विरोधात इतर पदाधिकारी यांच्याही तक्रारी होत्या.

महापालिका निवडणुकीनंतर याची दखल उद्धव ठाकरे सेनेने घेतली असल्याचे दिसून येते. आता मानमोडे यांना शेजारच्या रामटेक लोकसभा मतदार संघाचे सह संपर्क प्रमुख करण्यात आले आहे. हे एक प्रकारे डिमोशन असल्याने मानमोडे पक्षातून बाहेर पडतील असा अंदाज बांधला जात आहे.

जिल्हा प्रमुख किशोर कुमरिया पाचव्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून आले आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी बंडखोरी केली होती. मात्र यात त्यांना यश आले नाही. तिवारी हे माजी संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांचे समर्थक आहेत. चतुर्वेदी हे शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. नागपूर महापालिकेत उद्धव सेनचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले आहेत.

उद्धव सेनेने शहराच्या कार्यकारणीसुद्धा मोठे फेरबदल केले आहेत. महानगरप्रमुख किशोर कुमेरिया शहर प्रमुख- संदीप रियाल पटेल (नागपुर मध्य व पश्चिम), हरिभाऊ बानाईत (नागपुर पूर्व, उत्तर),विक्रम राठोड़ (नागपुर दक्षिण, दक्षिण-पश्चिम), उपशहरप्रमुख- महेंद्र कठाणे, शंकर थूल, राजू दलवी, पंकज अहिरराव, निखिल जाजुलवार व अभिषेक देशमुख यांचा आता यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एक शहरप्रमुख दीपक कापसे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वीच जय महाराष्ट्र केला होता. ते पुन्ह काँग्रेसमध्ये परतले आहेत. तिसरे शहर प्रमुख प्रवीण बरडे यांनाही कार्यकारणीत स्थान देण्यात आले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT