Nashik Politics : नाशिकच्या निफाडमध्ये उपनगराध्यक्षावर जादूटोणा ; काळ्या बाहुल्या, लिंबू व धमकीच्या चिठ्ठ्या..

Niphad black magic case : महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊन तेरा वर्षे झाली असली तरी, असे धक्कादायक प्रकार घडत असतात. नाशिकच्या निफाडमध्ये घडलेल्या प्रकाराची चर्चा आहे.
Niphad black magic case
Niphad black magic caseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे नारळाला शेंदूर लावून त्यावर त्यांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचे लिहलेली चिठ्ठी आढळल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी अनिल कुंदे यांचे पुतणे जयदीप कुंदे यांनी निफाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. उपनगराध्यक्ष कुंदे यांच्या शेतात बाहुल्या, लिंबू आणि गुलाल टाकलेली धमकीची चिठ्ठी आढळून आल्याने हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या प्रकरणी निफाड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनिल कुंदे यांच्या शेताच्या बांधावर रात्रीच्या सुमारास अज्ञाताने टाचण्या टोचलेली लिंबे, तसेच बिबे, हिरव्या बांगड्या, तसेच नारळावर शेंदूर लावलेला प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. टाचण्या टोचलेल्या तीन काळ्या बाहुल्या आढळून आल्या असून, प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र चिठ्ठी बांधलेली होती. जयदीप कुंदे हे कामानिमित्त शेतात गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

Niphad black magic case
Chhagan Bhujbal : निर्दोष असताना अडीच वर्ष भुजबळांना तुरुंगात काढावी लागली, 'माफी मागा'.. संजय राऊतांचा हल्लाबोल कुणावर?

मिळालेल्या माहितीनुसार अनिल कुंदे यांच्या शेताच्या बांधावर रात्रीच्या सुमारास अज्ञाताने टाचण्या टोचलेली लिंबे, तसेच बिबे, हिरव्या बांगड्या, तसेच नारळावर शेंदूर लावलेला प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. टाचण्या टोचलेल्या तीन काळ्या बाहुल्या आढळून आल्या असून, प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र चिठ्ठी बांधलेली होती. जयदीप कुंदे हे कामानिमित्त शेतात गेले असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

हा प्रकार शेतात कामानिमित्त गेलेले जयदीप कुंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ निफाड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये कुंदे कुटुंबातील तिन्ही भावांविषयी वेगवेगळे लिखाण केले असून अनिल कुंदे यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिली आहे’ अशा शब्दांत एका चिठ्ठीत धमकी देण्यात आली आहे.

Niphad black magic case
Nashik NMC : नाशिकमध्ये शिवसेना सत्तेत बसल्यास गेम फिरणार, वाटाघाटीत भाजपच्या हातून 'हे' महत्वाचे पद निसटण्याची शक्यता

तसेच इतर दोन चिठ्ठ्यांमध्ये कुंदे यांच्या दोन्ही भावांनाही धमकीवजा इशारा देण्यात आला आहे.धमकीच्या या चिठ्ठ्यांमध्ये काळी जादू, तांत्रिक उपाय व अमंगल शक्तींचा उल्लेख असल्याने हा जादू टोण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत निफाडचे उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर, पोलिस कर्मचारी नितीन सांगळे, विनोद जाधव व भास्कर पवार यांनी घेतली असून त्यांनी स्वत: घटनास्थळी येत पाहणी केली.

दरम्यान ज्या चिठ्ठ्यांमधून धमकी देण्यात आली आहे त्या चिठ्ठ्या हस्ताक्षरतज्ज्ञ व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्याआधारे संशयितांचा शोध घेतला जाणार आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा अंधश्रद्धा व गुन्हेगारी कृत्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा आहे.

Niphad black magic case
Nashik Deputy Mayor : नाशिकमध्ये महापौरपद महिलेला, उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवकांनी धरला वेगळाच हट्ट

राजकीय हेतूने प्रेरित

हा प्रकार पूर्णतः राजकीय सूडबुद्धीतून घडवून आणला गेला आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीला आळा घालण्यासाठीच हा घृणास्पद प्रयत्न करण्यात आला असावा. गेल्या २५ वर्षांपासून मी गोरगरीब नागरिकांसाठी आणि निफाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहे. अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे मी कधीही डगमगणार नाही. कोणी कितीही जीवघेणे कट रचले तरी माझा संघर्ष थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया निफाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com