Ram Satpute, Rahul Narwekatr Sarkarnama
नागपूर

Ram Satpute : फडांना आग लागल्याच्या घटना...  सातपुतेंनी केली ही मागणी

Anand Surwase

Nagpur News : वीज वाहक तारांचे शार्ट सर्किट झाल्याने उसाच्या फडात आग लागल्याच्या घटना सातत्याने घडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी राज्याच्या उर्जा विभागाकडून शेतकऱ्यांच्या उसावरून जाणाऱ्या तारा शिफ्ट करण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी हिवाळी अधिवेशामध्ये केली आहे.

ऊस हे नगदी पीक असून त्याला वर्षभर जोपासावे लागते. मात्र बऱ्याच वेळा ऊस साखर कारखान्याला जाण्यापूर्वीच विजेच्या तारांना शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या फडाला आग लागण्याचे प्रकार घडतात. उसाच्या फडावरून मोठ्या प्रमाणात वीज वाहक तारा जातात. त्यातील काही तारा लोबकळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ठिणग्या पडून उसाच्या फडाला आगी लागण्याच्या घटना घडतात. यावरून आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी सभागृहात लक्षवेधीच्या चर्चासत्रात हा मुद्दा उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातपुते म्हणाले की, माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तसेच माळशिरस तालुक्यात 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या ऊसाचे फड तारांचे शॉर्ट सर्कीट होऊन पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच या शेतकऱ्यांना महावितरण विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे ऊर्जा विभागाने आरडीएसएस योजनेतून जुन्या लाईन बदलण्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसावरून वीज वाहक तारा जात आहेत त्या शिफ्ट कराव्यात,अशी मागणीही त्यांनी यावेळी सभागृहात केली.

ठेकेदारांची पोलखोल

तसेच आरडीएसएस योजनेतून उर्जा विभागाची जी कामे सुरू आहेत. ती कामे ज्या ठेकेदारांना दिली जात आहेत. ती कामे ज्या ठेकेंदारांनी यापूर्वीची कामे पूर्ण केलेली नाहीत, अशा ठेकेदारांना न देण्याची मागणी ही सातपुते यांनी केली. हे ठेकेदार कामे घेऊन ठेवतात, आणि ती पूर्ण करत नसल्याची सातपुतेंनी यांनी सांगितले. त्यामुळे यापूर्वीचीच कामे ज्यांनी पूर्ण केली नाहीत, त्यांना पुन्हा कामे न देण्याची मागणी ही आमदार सातपुतेंनी केली.

दरम्यान, यावर उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा ठेकेदारांची पडताळी केली जाईल आणि त्यांना कडक सुचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. तसेच उसाच्या फडावरून जाणाऱ्या वीज वाहक तारा शिफ्ट करण्यासंदर्भात पाहणीकरून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT