Shambhuraj Desai : दिग्गजांच्या सभा नंतर देखील मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाईंचा झेंडा 

Satara Political News : मल्हारपेठ ग्रामपंचायतीला 3 कोटीचा विकास निधी 
Shambhuraj Desai : दिग्गजांच्या सभा नंतर देखील मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाईंचा झेंडा 

Patan News : मल्हारपेठ ग्रामपंचायतीत गेले पाच वर्ष शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाची सत्ता होती. त्यामुळे शिवसेना फूटीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट करण्यासाठी मल्हारपेठ येथे ठाकरे गटाच्या 3 दिग्गजांच्या सभा झाल्या. यात आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी मल्हारपेठ ग्रामपंचाय निवडणुकीच्या निमित्ताने शंभूराज देसाईंवर जोरदार हल्लाबोल केला. या नेत्यांनी मल्हारपेठ ग्रामपंचायत देसाई यांच्या ताब्यात नसल्याचा उल्लेख करत डिवचले होते. त्यामुळे मल्हारपेठ ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली होती. अखेर देसाई यांच्या गटाने मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर झेंडा लावला आहे. त्यानंतर देसाई यांच्या कडून एका महिन्यात ग्रामपंचायतीला 3 कोटीच्या विकास कामांचे गिफ्ट दिले आहे. 

साताऱ्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षांचा सत्तासंघर्ष स्थानिक पातळीवर पहायला मिळत असून अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरूध्द महायुतीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे हे फूटीनंतर शिंदे गटात सामील झाले आहेत. या फूटीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना विरोधकांकडून वरिष्ठ पातळीवरून टार्गेट केले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shambhuraj Desai : दिग्गजांच्या सभा नंतर देखील मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाईंचा झेंडा 
Babanrao Lonikar Rajesh Tope audio clip : एका आमदाराची दुसऱ्या आमदाराला शिवीगाळ

पाटण मतदार संघात मल्हारपेठ येथेच ठाकरे गटाच्या अनेक दिग्गजांनी सभा घेवून आहे. देसाईंना चॅलेंज देत मल्हारपेठ ग्रामपंचायत ताब्यात नसल्याचा वरोवार उल्लेख केला जात होता. मल्हारपेठ ग्रामपंचायत ताब्यात नसल्याचा शब्द देसाईंना आणि त्याच्या कार्यकर्त्यांना चांगलाच लागत होता. अखेर पंचवार्षिक निवडणूक लागली अन् शंभूराज देसाई यांच्या गटाने सत्तांतर केले आहे.  

ग्रामपंचायत मध्ये सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले होते. आता सरपंच किरण दशवंत यांनी पदभार स्वीकारल्या नंतर तातडीने 3 कोटीचा विकास निधी ग्रामपंचायतिला मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून मल्हारपेठ (बाजारपेठ) ते जमदाडवाडी रस्त्याची सुधारणा, लिंगायत समाज स्मशानभूमी रस्ता मल्हारपेठ ते सोंडेवाडी रस्त्याची कामे करणार असल्याची माहिती  सरपंच किरण दशवंत यांनी दिली आहे  

Shambhuraj Desai : दिग्गजांच्या सभा नंतर देखील मल्हारपेठ ग्रामपंचायतीवर शंभूराज देसाईंचा झेंडा 
Old Pension Scheme : जुनी पेन्शन देणार की नाही? मुद्दा तापला, उद्या सामूहिक रजा आंदोलन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com