Nagpur : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा स्वीय सहायक असल्याचे सांगून एकाने दोन वर्ष हॉटेलमध्ये जेवणावर ताव मारला. पन्नास हजारांची उधारी केली, बिलाचे पैसे मागणाऱ्या हॉटेलचालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तोतया स्वीय सहायकाला पोलिसांनी अटक केली आहे.
ललित रामसंजीवन अग्निहोत्री (३३, रा. रामनगर, वर्धा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुर्गाप्रसाद रामनरेश पांडे (४५, रा. गणेशपेठ कॉलनी),असे जखमी हॉटेलचालकाचे नाव आहे.
याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी ललित अग्निहोत्री याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. काल (मंगळवारी) नागपूर येथे ही घटना घडली. पांडेंचे बसस्थानकासमोर हॉटेल अंबिका, हॉटेल ब्रिज इन आहे.
ललित याने आपण नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याचे पांडे यांना सांगितले. त्यानंतर दोन वर्षांपासून तो हॉटेलमध्ये जेवण करायचा. मित्रांनाही हॉटेलमध्ये जेवायला आणायचा. दोन वर्षांत त्याने ५० हजार रुपयांची उधारी केली. काही दिवसांपूर्वी दुर्गाप्रसाद पांडे यांना त्याच्याबाबत संशय आला.
मंगळवारी दुपारी ललित हा हॉटेल ब्रिज इनमध्ये जेवायला गेला. जेवण केल्यानंतर पैसे न देताच तो परत गेला. तो पुन्हा रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवायला आला. तेव्हा पांडे यांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची उधारी मागितली. तेव्हा त्याने दुपारीच अंबिका हॉटेलमध्ये पन्नास हजार जमा केल्याचे सांगितले. पण त्याने हे पैसे जमा न केल्याचे चौकशीत आढळले.
बिलाचे पैसे मागितल्याने पांडे यांच्यावर त्याने चाकूने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. येथील कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. पांडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे गणेशपेठ पोलिसांनी सांगितले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.