sarkarnama
नागपूर

आघाडीत वाद पेटणार ; पटोले म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) इशाराच दिला.

सरकारनामा ब्युरो

नागपूर : मुंबईवगळता राज्यातील इतर महापालिकांसाठी तीनऐजवी दोन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या काँग्रेसच्या फेरप्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली; मात्र मागील बैठकीतील निर्णय कायम ठेवण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला. त्यामुळे पुण्यासह सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यांचाच प्रभाग राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

''तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध आहे. तसे मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आले होते. पत्रही देण्यात आले होते. यानंतरही तीनचा प्रभाग कायम ठेवला जात असेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने त्यास विरोध करू,'' असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) इशाराच दिला.पटोले माध्यमांशी बोलत होते. त्यामुळे आता यविषयावर आपण आता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार नाही. सरकाच्या निर्णयाला आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करणार आहोत. सरकार आणि संघटना वेगवेगळ्या असतात. संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जाऊन संघर्ष करू, असेही पटोले नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करावी या लोकप्रतिनिधींच्या भावना होत्या. महापालिका क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या नागरिकसुद्धा याच मताचे आहेत. या जनभावना आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्या होत्या. नागपूर शहर काँग्रेसने दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करण्यात यावी असा ठरावही केला आहे. यानंतरही तीनचा प्रभाग कायम ठेवला जात असल्याचे कळले

माजी आमदार तसेच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आशिष देशमुख यांच्यावरील आरोपांची काँग्रेसचे प्रभारी चंद्रकांत हांडोरे चौकशी करीत आहेत. ते जो अहवाल सादर करून त्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. आशिष देशमुख यांच्यावर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा आरोप आहे. भाजप उमेदवारांसोबत बैठक घेत असल्याचा त्यांना फोटही समाज माध्यमांवर व्हायरला झाला आहे. जिल्हा काँग्रेस कमेटीने देशमुखांची हकालपट्टी करण्याचा ठराव केला आहे.

शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या भाषणाचा व्हीडीओ सध्या चांगलाच गाजत आहे. त्यात त्यांनी काँग्रेसला कुंत्र विचार नव्हते, उद्धव ठाकरे यांनी सत्तेत घेऊन मृत काँग्रेसला जिवंत केल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असताना नाना पटोले यांनी नो कॉमेंट्स बोलून या विषयावर भाष्य करण्यास टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT