मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी शिवसेना का सोडली यांचे उत्तर दिलं. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी त्याचे कारण सांगितले. ''आरक्षणाच्या बाबतीत शिवसेना कधीही बोलली नाही. आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका घेऊन मी मोर्चात सहभागी झालो होतो. तेव्हा माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरू झाली राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) पत्रकार परिषद घेणार होते. त्याचवेळी मंडल आयोग लागू झाला पाहिजे, म्हणून अनेक आमदार माझ्यासोबत होते. अन् हेच कारण झालं मी शिवसेना सोडली,'' असे भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले, ''मी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी वसंतदादा पाटलांच्या अंगावर आम्ही धावून जायचो, तत्कालीन सरकारने आम्ही मंडल आयोग स्वीकारतोय, असं सांगितलं होते. व्ही. पी. सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केलं. अन् माझ्याविरोधात शिवसेनेत कुरबुरी सुरु झाली. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब नाशिकच्या घरी आले होते. त्याचवेळी भटक्या विमुक्तांचा मोर्चा निघाला होता. बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. आरक्षण मिळालं पाहिजे, असं मी नेहमी म्हणायचो. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते. त्यामुळे शिवसेना आणि माझ्यात दुरावा झाला अन् मी शिवसेना सोडली. त्यानंतर मी समता परिषदेची स्थापना केली.''
भुजबळ म्हणाले, ''मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली. कारण श्रीकृष्ण आयोग आम्ही स्वीकारु असे आम्ही जाहीर केले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत माझ्याकडे आले. आमचे बोलणे झाले. मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता, पण निर्णय घेतला नसता तर अडचणीचे झाले असते म्हणून मातोश्रीलाच तुरुंग जाहीर करण्याची तयारीही केली होती. पण ती वेळ आली नाही. अटकेच्या घटनेनंतर बाळासाहेबांनी मला सहकुटुंब मातोश्रीवर जेवायला बोलावले. जेवणातील टेबलावर आमच्यातील वाद क्षणात नष्ट झाले.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.