Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh Sarkarnama
नागपूर

Anil Deshmukh : फडणवीस-देशमुख यांच्यातील वाद पुन्हा उफाळणार, नेमकं कारण काय?

Rajesh Charpe

Anil Deshmukh News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. दोघांमधील ‘पेनड्राईव्ह'चा वाद चांगलाच रंगला होता. आता असंघटित बांधकाम कामगार कल्याण मंडाळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्यामुळे पुन्हा दोन्ही आजी-माजी गृहमंत्री वादविवादाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होणार आहे.

मुन्ना यादव हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आहेत. दोन दिवसांपूर्वीच पोलिस ठाण्यात जाऊन एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अंगावर ते धावून गेले होते. धमक्याही दिल्या. पोलिसांनी तब्बल 24 तासानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून अनिल देशमुखांनी निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते मुन्ना यादव यांची गुंडगीरी दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलिसांना ते जुमानत नसून पोलिस स्टेशनमध्येच मुन्ना यादव व त्यांचे सहकारी वरीष्ठ पोलिसांच्या अंगावर धावून जातात, त्यांना धमक्या देतात. मुन्ना व त्याचे सहकारी मारहाण करतात, त्यात 4 जण गंभीर जखमी होवून त्या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱ्यांना पोलिस कोणाच्या दबावाखाली अभय देत आहे, असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

मुन्ना यादव हा भाजपाचा कार्यकर्ता असून तो देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा आहे. मुन्ना यादव याची नागपूर शहरात इतकी दहशत आहे की त्याच्या विरुध्द कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्याच्या विरुध्द गंभीर गुन्हाचे आरोप होते. तरीसुध्दा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद दिले. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करून गुडांना अभय देत आहे काय असा प्रश्नसुध्दा अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

कठोर कारवाईची मागणी

चुनाभट्टी परिसरात शनिवारी रात्री मुन्ना यादव व त्याच्या गुडांनी काही जणांना मारहाण केली. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला येवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देवून पोलिसांच्या अंगावर हातसुध्दा उगारला तसेच बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणात त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी चुनाभट्टी येथील गँगवार प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या दोन्ही प्रकरणात मुन्ना यादव याच्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT