Amol Mitkari: 'तुतारी' हाती घेताच हर्षवर्धन पाटलांचा सुळेंच्या विजयाबद्दल गौप्यस्फोट; मिटकरी म्हणतात, 'आम्हाला संशय होता...

NCP Vs NCP Sharad Pawar : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Amol Mitkari On Harshvardhan Patil .jpg
Amol Mitkari On Harshvardhan Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Akola News : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अखेर भाजपची साथ सोडली आहे.त्यांनी कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी (ता.7) इंदापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्या चौथ्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट केला. यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पलटवार करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटात प्रवेशावर खोचक टीका केली आहे.मिटकरी यांनी सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले,बारामती लोकसभेच्यावेळी हर्षवर्धन पाटील हे धोका देतील हा जो आमचा संशय होता, तो त्यांनी आज त्यांच्या भाषणातुन सिद्ध केला. जे मुंडेसाहेब,व नंतर काँग्रेसचे झाले नाहीत ते भविष्यात आपल्यासोबतही गद्दारी करू शकतात, हे साहेबांना चांगलं ठाऊक आहे, असे मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Amol Mitkari On Harshvardhan Patil .jpg
Uddhav Thackeray News: भाजपकडून उद्धव ठाकरेंना 'मुख्यमंत्री'पदाची ऑफर...? 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

याचवेळी विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी हर्षवर्धन पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी आता दिल्या घरी सुखी राहावे असा चिमटाही काढला आहे. त्यांनी दसऱ्यानंतर अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार असल्याचा दावाही केला आहे.

तसेच त्यांनी रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील,डॉ.राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचंही सांगितलं आहे.दसरा झाल्यानंतर अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार,असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

'सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी...'

माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला.यावेळी पाटील यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले, सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत.त्या संसदरत्न खासदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुप्रिया सुळे या चारवेळा खासदार झाल्या.तुम्ही तीनवेळा खासदार होण्यात आमचा प्रत्यक्षपणे थोडाफार सहभाग होता.तर चौथ्यावेळी झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट केला.

Amol Mitkari On Harshvardhan Patil .jpg
Harshavardhan Patil : जयंतरावांची ऑफर अन् सुळेंना लोकसभेला अदृश्य मदत; 'तुतारी' हाती घेताच हर्षवर्धन पाटलांची जोरदार बॅटिंग

काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातत्याने टीका केली जात आहे. यावरुन आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, शरद पवारांवर कुणी पातळी सोडून टीका झाल्यावर आम्ही ते सहन करीत नाहीत. मग सुप्रिया आपल्या भावावरची टीका का सहन करत आहेत? अशी विचारणा मिटकरी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com