Nitin Gadkari: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे आपल्या अतिरंजित दाव्यांमुळं कायम चर्चेत असतात. पण बऱ्याचदा ते अत्यंत स्पष्टपणेही बोलत असतात, सरकारी कामकाजाबद्दलही ते बेधडक विधानं करतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक विधान केलं आहे. सरकार म्हणजे निकम्मी यंत्रणा आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर इथल्या सुरेश भट सभागृहात आयोजित 'खेळावर आधारित करिअर' या विषयावर व्याख्यान देताना नितीन गडकरी बोलत होते.
जेव्हा तुमचे अच्छे दिन असतात तेव्हा समोरुन तुमचं कौतुक करणारे अनेक लोक असतात. कारण क्रेझ असते ग्लॅमर असतं. पण जेव्हा तुमची वेळ संपलेली असते कोणीही विचारत नाही. त्यामुळं जर पर्मनंट तुम्हाला लोकांनी वागवलं पाहिजे असं वाटत असेल तर करियर बनवा. मी फायनान्शिअल कन्सल्टंट नाही पण फायनान्शिअल एक्स्पर्ट आहे. मी पाच-पाच लाखांची काम बिनपैशाची करत आहे. नागपुरात खेळण्यासाठी ३०० स्टेडियम बनवण्याची माझी इच्छा आहे. पण माझ्या चार वर्षांच्या अनुभवानंतर माझ्या हे लक्षात आलं की, सरकार ही गोष्ट असते ती खूपच निकम्मी असते. कॉर्पोरेशन, एनआयटी यांच्या भरवशावर कोणतंही काम होऊ शकत नाही. चालत्या गाडीला पंक्चर करण्यात ते तरबेज असतात.
एकदा दुबईतून आलेल्या एका व्यक्तीनं मला सांगितलं की, मी दुबईत खेळाचं स्टेडियम चालवतो. यावर मी त्याला विचारलं की कसं काय चालवता? त्यावर मी ठरवलं, "टेंडर काढून १५ वर्षांसाठी आम्ही तुला जागा भाड्यानं देऊ. लाईट, पाण्याची, कपडे बदलण्याची जागा उपलब्ध करुन देऊ, गॅलरी बनवून देऊ.... पण लॉन ती व्यक्ती मेंटेन करेल. त्यानंतर एरियाप्रमाणं इथं जी कोणी मुलं खेळायला येतील त्यांच्याकडून खेळण्यासाठी महिन्याला तो ५०० किंवा १००० रुपये अशी कमीत कमी फी आकारेन. फुकटात काहीही शिकवता कामा नये, मी तर राजकारणात आहे. राजकारणात फुकट्यांचा बाजार असतो सगळा पण मी काहीही फुकटात देत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.