Tejsvi Yadav: तेजस्वी यादव बिहारची निवडणूक लढणार नाहीत? लालू प्रसाद यादवांचं स्वप्न अधुरं राहणार?

Tejsvi Yadav: बिहारमध्ये निवडणूक आयोगानं सुरु केलेल्या विशेष मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेंतर्गत सुमारे ६८ लाख मतदारांची नावं विविध कारणांमुळं वगळण्यात आले आहेत.
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Tejsvi Yadav: बिहार विधानसभा निवडणूक यंदा चांगलीच गाजणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या विशेष मतदार यादी परीक्षण सुरु केल्यानं मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. यातून सुमारे ६८ लाख मतदार विविध कारणांमुळं वगळण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर बिहारच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधक घेण्याच्या तयारीत आहेत.

प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. पण जर त्यांनी ही निवडणूक लढवली नाहीतर त्यांचे वडील बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांचं एक स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे.

 Lalu Prasad Yadav
Ravindra Chavan: 'संविधान बचाव'ची 'शो'बाजी करणारे...; PM मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना रविंद्र चव्हाणांचं उत्तर

तेजस्वी यादव यांनी नेमकं काय म्हटलंय?

एक गोष्ट स्पष्ट आहे की आता सर्वकाही ठरलंच आहे की खुलेआम बेईमानी करायचीच आहे, मतदार यादीतून लाखो लोकांची नाव कापायची आहेत. याच लाखो मतदारांनी मोदींना मतदान केलं आहे. अनेक सरकारनं यांनीच निवडली तेव्हा ते ठीक होतं, पण आता अचानक ही गडबड कशी काय झाली? हाच तर प्रश्न विचारला जात आहे. सरकारचे लोक स्वतःचं म्हणतं होते की आम्ही खोटेपणा करुन निवडून आलो आहोत.

आता पुन्हा एकदा खोटेपणा करुन निवडून येणार आहोत. ही बेईमानीच करायची असेल तर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार करु शकतो. आम्ही महागठबंधनमधील सर्व घटकपक्षांशी याबाबत चर्चा करु. जर लोकशाहीत जनताच मतदान करणार नसेल तर मग निवडणूक घेण्याला अर्थच काय राहतो. चंदीगडसारखं तुम्ही बिहारमधली निवडणूक हायजॅक करणार असाल तर याला काय अर्थ राहणार आहे. त्यामुळं यावर आम्ही गांभीर्यानं चर्चा करत आहोत. त्यामुळं निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची चर्चा आम्ही करु शकतो, हा पर्याय आमच्याकडं खुला आहे.

 Lalu Prasad Yadav
Students Death : नैराश्यामुळं विद्यार्थी संपवताहेत स्वतःचं जीवन! सुप्रीम कोर्टानं जारी केली मार्गदर्शक तत्त्वे! केंद्राला कायदा करण्याचे आदेश, तोपर्यंत...

मुख्यमंत्रीपदाची संधी गमावणार?

पण जर महागंठबंधन किंवा राजदनं ही विधानसभा निवडणूक लढवली नाही तर तेजस्वी यादव यांचं काय होणार? पण यामुळं प्रश्न हा उपस्थित होतोय की तेजस्वी यादव यांचं आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांचं मुलगा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अधुरं राहणार का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. पण जर खरंच तेजस्वी यादव यांनी ही निवडणूक लढवली नाही तर काय होऊ शकतं, याचाही आढावा घेऊयात. तेजस्वी यादव आपल्या विजयासाठी नवंनवे फंडे वापरत असल्याचंही सांगितलं जात आहे. कारण ज्या पद्धतीनं ते एसआयआर अर्थात मतदार याद्यांचं विशेष गहन पुनर्परीक्षणाला विरोध करुन आपण त्या लोकांच्या अधिकाऱांसाठी लढतो आहोत ज्यांची नाव याद्यांमधून कापली जात आहेत. दलित, पीडीत आणि मुस्लिमांची मतं या विषेश मोहिमेद्वारे मुद्दामहून कापली जात आहेत, हा संदेशही त्यांनी दिला आहे.

 Lalu Prasad Yadav
Eknath Shinde: मोठी बातमी: फडणवीसांनंतर शिंदेही घेणार अमित शहांची भेट? शिरसाट, राठोड,कदम यांचं मंत्रिपद वाचणार?

तेजस्वी यादव यांची चाल काय असू शकते?

त्याचबरोबर राजदनं हा देखील आरोप केला होता की, प्रत्येक मतदारसंघातून २५ हजार मतदारांची नावं कापली जात आहेत. याचा अर्थ असा की, जर ते कोणत्याही मतदारसंघातून २५ हजार मतांनी हारले तर ते सांगू शकतात की कट कारस्थान करुन आम्हाला सत्तेबाहेर ठेवण्यात आलं आहे. तसंच जर ते जिंकूनही आले तर असंही सांगू शकतात की आम्ही सत्ताधाऱ्यांपेक्षा किमान २५ हजार अधिक मतांनी निवडून आलो असतो.

 Lalu Prasad Yadav
Maharashtra Politics : अजितदादांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'चे संकेत; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, आकामुळे...

बिहारमध्ये किती मतदारांची नाव कापली?

बिहारमध्ये गेल्या महिन्याभरापासून राबवण्यात येत असलेल्या विशेष गहन पुनर्परीक्षण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ९९ टक्के मतदारांचा समावेश पूर्ण झाला आहे. यामध्ये २१.६ लाख मृत मतदारांची नाव वगळण्यात आली आहेत. ३१.५ लाख मतदार स्थलांतरित असल्याचं आढळलं आहे, त्यामुळं त्यांचीही नाव वगळण्यात आली आहेत. ७ लाख मतदारांची नावं एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेली आहेत, ही नावंही वगळण्यात आली आहेत. १ लाख मतदार शोधूनही सापडलेले नाहीत तसंच घरोघरी भेटी देऊनही ७ लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळं त्यांचीही नावं या यादीतून वगळण्यात आली आहेत. अशा विविध कारणांनी एकूण ६८ लाख मतदारांची नाव वगळण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com