Yogesh Kadam Sarkarnama
नागपूर

Mla Disqualification Case : गुवाहाटीतील हॉटेलची बुकिंग एकनाथ शिंदे किंवा भाजपने केली होती का? योगेश कदमांचे बोलके उत्तर...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics News : नागपुरात एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार आपत्रेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीही सुरू आहे. या सुनावणी शिंदे गटाचे आमदार योगेस कदम यांची ठाकरे गटाकडून उलट तपासणी झाली. या तपासणीत योगेस कदम यांवर अवघड प्रश्नांची सरबत्ती झाली.

गुवाहाटीला जाण्यापूर्वी आणि गुवाहाटीत गेल्यावर काय घडले यासंदर्भात अनेक प्रश्न आमदार योगेश कदम यांना विचारण्यात आले. यावर योगेश कदम यांनीही सावध उत्तरे दिली. गुवाहाटीला जाण्यासाठी विमानाचे तिकीट स्वतः काढले का? असा प्रश्न ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर योगेश कदम यांनी उत्तर देत ही वैयक्तिक माहिती असून उघड करण्यास नकार दिला, असे म्हटले.

गुवाहाटीत २२ जूनच्या रात्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यावेळी त्यावेळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्यासह एकूण ३९ आमदार होते, असे कदम यांनी उलट तपासणीत सांगितले. तसेच गुवाहाटीतील हॉटेलचे बुकींग कुणी केले? एकनाथ शिंदे किंवा भाजपने केले होते का? यावरही आमदार कदम यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. बहुसंख्य आमदारांना पाठिंबा देण्याचा तुमचा निर्णय शिवसेनेच्या निर्णयाच्या आणि आदेशाविरोधात होता, असे वकील कामत म्हणाले. त्यावर कदम यांनी हे खरे नसल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला आपला पाठिंबा असल्याचे आमदार योगेश कमद यांनी यावेळी स्पष्ट केले. योगेश कदम यांची साक्ष संपली आहे. आता उद्या सकाळी 8.30 ते 11.30 वाजेदरम्यान शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT