Shiv Sena MLA Disqualification Case
Shiv Sena MLA Disqualification CaseSarkarnama

Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी मोठा गौप्यस्फोट; ‘एकही आमदार अपात्र होणार नाही...’

Shyam Manav's Statement : येत्या काही दिवसांत आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे.
Published on

Wardha News : शिवसेना आमदार अपात्रतेचा प्रकरणाचा निकाल जवळ आलेला असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी विदर्भात मोठे खळबळजनक विधान केले आहे. बंडखोर आमदार कोणीही अपात्र होणार नाही, असे गुवाहाटीवरून आलेल्या माजी मंत्र्याने मला सांगितले आहे, असा दावा मानव यांनी केला आहे. मानव यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडण्याची शक्यता आहे. (No Singal MLA of Shiv Sena will be Disqualified : Shyam Manav's claim)

शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलेला आहे. येत्या काही दिवसांत आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांचे हे विधान महत्वाचे मानले जात आहे. हे सर्व सांगताना त्यांनी त्या वेळी मंत्री असललेल्या एका आमदाराचा हवाला दिलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shiv Sena MLA Disqualification Case
Bidri Sugar Factory Result : दोन मंत्री, दोन खासदार, सात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ‘बिद्री’ची मतमोजणी सुरू

‘सर, न्यायालयाच्या निर्णयाची चिंता करू नका. या प्रकरणात न्यायालयाचा हस्तक्षेप होईल. बहुमत चाचणी करायला परवानगी देण्यात येऊ नये, अशी शिवसेनेची मागणी फेटाळून लावण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख वाढवून देण्यात आली. त्यामुळे विधानसभेच्या उपाध्यक्षांनाही काही करता आलं नाही. न्यायालयाचे निर्णय असे येतील की, आमचे सरकार अडीच वर्षे सुरळीतपणे चालेल, असे गुवाहाटीवरून आलेल्या एक माजी मंत्र्याने मला सांगितले होते. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयही तसेच आले, ’असे श्याम मानव यांनी सांगितले.

हे पन्नास घ्या, नाही तर जेलमध्ये जावा. जेलमध्ये जायचे की हे पन्नास घ्यायचे. पन्नास घ्यायचे नसतील तर मंत्रिपद घ्यायचे. मंत्रिपद मिळणार नसेल तर पन्नास घ्या, असे तेव्हा सांगण्यात आले होते, असेही माजी मंत्री असलेल्या माझ्या मित्राने मला सांगितले होते, असा मोठा गौप्यस्फोटही मानव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

Shiv Sena MLA Disqualification Case
Katipally VenkataRamana Reddy : चाळीस वर्षांनी केसीआरचा पराभव करणारे; जायंट किलर कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी

‘सरकारच्या विरोधात बोलणं, लोकांना जागृत करणं, सरकारची चुकीची कृती लोकांपर्यंत पोहोचवणे, हे मीडियाचं कर्तव्य आहे. पण आजची परिस्थिती तशी आहे का. तसं मीडिया आता वागू शकतो का,’ असा सवाल करून श्याम मानव म्हणाले की, ‘पूर्वी अधिकारी हे मंत्र्यांना सांगायाचे हे काम मला करता येणार नाही. पण आता तेच अधिकारी म्हणतात की सरकार बदलू द्या. मग आपण ॲक्शन घेऊ. हे सरकार असेपर्यंत आम्हाला काहीही करता येणार नाही.’

Shiv Sena MLA Disqualification Case
Solapur Politics : नागेश वल्याळ अन्‌ सहकारी चंद्रकांतदादांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com