Sudhir Mungantiwar Sarkarnama
नागपूर

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर धानोरकरांचेच, मुनगंटीवार अडीच लाखांनी पराभूत

Maharashtra Lok Sabha 2024 Results : भाजपचे उमेदवार व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल २ लाख ५३ हजार २५६ मतांनी पराभूत

Sudesh Mitkar

राजेश चरपे
Chandrapur News : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आपलाच आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सिद्ध करून दाखवले. त्यांनी भाजपचे उमेदवार व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल २ लाख ५३ हजार २५६ मतांनी पराभूत केले.

प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांनी मागील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे त्यांनी राजकीय अस्तित्व जिल्ह्यातून संपवले. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर विजयी झाले. पती खासदार आणि पत्नी आमदार असे एकाच घरी दोन नेते वावरत होते. दुर्दैवाने खासदार बाळू धानोरकर यांचे आजाराने अकाली निधन झाले. 

त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रतिभा धानोरकर यांची पदर खोचला. काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला  विरोध केला होता. यात विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता. त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर मतदारसंघावर दावा ठोकला होता. यावरून मोठे मतभेद काँग्रेसमध्ये निर्माण झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे धानोरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. धानोरकर कुटुंबीयांची लोकप्रियता आणि जातीय समिकरण बघून सुधीर मुनगंटीवार यांची निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती. मात्र पक्षाचा आदेश झाल्याने त्यांचा नाईलाज झाला.

काँग्रेसचा चंद्रपूरचा विजयाची खात्री होती. शेवटी अपेक्षित असाच निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला. धानोरकर यांना ७ लाख ४२ हजार ८ तर मुनगंटीवार यांना ४ लाख ५० हजार ८५२ मते पडली. सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्यांनी प्रतिभा धानोरकर निवडूण आल्या आहेत. विशेष म्हणजे मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांमध्ये त्या आघाडीवर होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT