Pune Lok Sabha 2024 Election Winner: धंगेकर पॅटर्न फेल, पुण्याचा आखाडा अण्णांनी जिंकला

Pune Muralidhar Mohol Defeats Congress Ravindra Dhangekar : मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांचा तब्बल ९० हजरांवरून जास्त मताधिक्य त्यांना मिळाले आहे.
Pune Lok Sabha Election 2024
Pune Lok Sabha Election 2024Sarkarnama

Muralidhar Mohol Pune Lok Sabha Election 2024 Winner : पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये अखेर आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांचा विजय झाला आहे.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एक्झिट पोलमध्ये आघाडीवर दाखवण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील आपणच विजय होणार हा विश्वास रवींद्र धंगेकर यांना होता. मात्र मुरलीधर मोहोळ यांचा विजय निश्चित झाला आहे. त्यांचा तब्बल ९० हजरांवरून जास्त मताधिक्य त्यांना मिळाले आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीचे मुरलीधर मोहळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यासह एमआयएमचा देखील उमेदवार रिंगणात होता. मात्र खरी लढाई ही महाविकासाकडे आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये झाली. 

सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये शेवटी रवींद्र धंगेकर यांनी चुरस आणली होती. काँग्रेसने देखील या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली राज्यातील पूर्ण ताकद लावून नागपूर येथील दहा आमदारांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह केलं होतं.

तसेच राहुल गांधी यांची सभा देखील घेण्यात अली.  मात्र याचा फारसा फायदा धंगेकर यांना झालेला पहिला मिळत नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना २४ हजार मते घेतली आहेत.   

लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीष बापट यांना जवळपास ३ लाख २० हजारांचे लीड होते. म्हणजे, या निवडणुकीत त्यांना सव्वासहा लाख मते मिळाली होती. पुण्यात २०१४ पासून भाजपची ताकद वाढली असून, या काळात पुण्यातील ८ आमदार भाजपचे राहिले.

त्यानंतर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाचे ९९ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपचे एकहाती वर्चस्व असल्याचे कागदावरील ताकदीने दिसून येते. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्य धंगेकरांनी भाजपपुढे आव्हान उभे केले.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात धंगेकरांनी काहीशी फिरवल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे मागील निवडणुकी प्रमाणे मोठा विजय साकार करण्यात भाजपाला यश आले नाही. 

कसब्यात झाला घात 

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार रवींद्र धंगेकराना 12000 मतांनी विजयी करणाऱ्या कसब्यानेच धनगेकरांचा घात केला असल्याचा समोर येत आहे. सर्व फेऱ्यांमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली असून धंगेकर आमदार असलेल्या मतदार संघात त्यांना आघाडी मिळत नसल्याचे  चित्र सध्या पाहायला मिळत आहे.  

Pune Lok Sabha Election 2024
Shrirang Barne : मावळमध्ये महायुतीचा विजय निश्चित, बारणे हॅटट्रिकचा रेकॉर्ड करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com