UPSC Result
UPSC Result Sarkarnama
नागपूर

चंद्रपुरातील तरुणांनी घडविला इतिहास : यूपीएससीत एकाच वेळी तिघांची बाजी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या देशातील सर्वोच्च नागरी सेवा समजली जाणारी यूपीएससी (UPSC Declare the Final Result) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवकांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. एकाच वेळी तीन जणांनी ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असल्याने जिल्ह्यात नवा इतिहास घडला आहे. यापरीक्षेत वरोरा येथील आदित्य चंद्रभान जीवने, सावली येथील देवव्रत मेश्राम आणि चंद्रपूर येथील अंशुमन यादव यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्हाभर त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारामध्ये आदित्यने मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून, त्याने परीक्षेत ३९९ रँकिंग मिळविले आहे. आदित्यचे वडील आनंदवन संचालित आनंद निकेतन महाविद्यालयात प्राध्यापक तर, आई शिक्षिका आहे. देवव्रतने ७१३ वे रँकिंग प्राप्त केले, तर अंशुमनने २४२ वा रँक मिळवला. अंशुमन सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. या तिघांचेही जिल्हाभर कौतुक केले जात आहे. दरम्यान, गुरुजन आणि कुटुंबियांमुळे यश मिळाल्याचे सांगत समाजासाठी उत्तम काम करण्याची इच्छा आदित्यने दर्शविली आहे.

आदित्य हा मूळचा वरोरा येथील आहे. आदित्यने २०११ मध्ये दहावी परीक्षा ९२ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. तेव्हा तो वरोरा तातुक्यातून प्रथम आला होता. त्यानंतर नागपूर येथे नारायणा विद्यालयातून सीबीएससी मध्ये बारावीची परीक्षा पास केली. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्याल, नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर विषयात पदवी प्राप्त केली. तिथून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी दिल्ली गाठली. पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीत अपयश आले. मात्र, या अपयशाने खचून न जाता आदित्यने पून्हा नव्या दमाने आयएएसची तयारी सुरू केली दुसऱ्या प्रयत्नात ३९९ रॅंक मिळवली आहे.

परीक्षा दिल्यानंतर अदित्यला झाली होती कोरोनाची लागण..

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर अदित्यला कोरोनाची लागण झाली. एप्रिल महिन्यात देशात सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असतांना आदित्य रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला उपचारार्थ दाखल केले होते. त्याचा सिटी स्कॅन स्कोअर १८ होता यावर त्यानी मात केली होती. तर, २४२ रँकने परीक्षा उत्तीर्ण करणारे अंशूमन यादव हे चंद्रपूर येथील जटपूरा गेट येथचे रहीवाशी आसून सध्या दिल्ली येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.

यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षेचा निकाल चांगलाच लांबणीवर पडला होता. कोरोनाच्या लाटेमुळे मुलाखतीचा अंतिम टप्पा पुढे ढकलण्यात आला होता. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निकालात शुभम कुमारने देशात पहिला क्रमांक पटकावला तर, जागृती अवस्थी आणि अंकिता जैनने अनुक्रमे तिसरा क्रमांक मिळवला आहे. आयएएस, आयपीएस, आयआरएस अशा 25 सेवांसाठी एकूण 761 जणांची निवड करण्यात आली आहे. दरवर्षी साधारण 900 ते 1000 उमेदवारांची निवड या परीक्षेमार्फत होत असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT