Vivek Kolhe Vs Kishore Darade sarkarnama
नाशिक

Nashik Teachers Constituency: नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे दराडे अन् विवेक कोल्हेंमध्ये 'टफ फाईट'

Nashik Teachers Constituency Result : नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतमोजणीत फेरीगणीस उत्सुकता शिगेला पोहचत असून मतमोजणीत धक्कादायक स्थिती पुढे येत आहे. अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

Sachin Waghmare

Nashik News: नाशिक विभाग शिक्षक परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार सकाळपासून सुरु आहे. मतांची जुळवाजुळव केल्यानंतर प्रत्यक्षात दुपारनंतर मतमोजणी सुरू झाली. या मतमोजणीत फेरीगणीस उत्सुकता शिगेला पोहचत असून मतमोजणीत धक्कादायक स्थिती पुढे येत आहे.

अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दराडे यांना पहिल्या फेरीत १७७५ तर दुसऱ्या फेरीत ४०० मतांची आघाडी आहे. दुसऱ्या क्रमांकावर विवेक कोल्हे आहेत. तिसऱ्या फेरी अखेर निश्चित केलेला कोटा पूर्ण न केल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात सोमवारी झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत शिवसेना (Shivsena) मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे सतराशे मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत किशोर दराडे व विवेक कोल्हे यांच्यात कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच ठाकरे गटाचे गुळवे यांनी ही चुरस निर्माण केली असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सोमवारी सकाळी प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाली. त्यानंतर झाला मतपत्रिकांचे गठ्ठे केल्यानंतर दुपारी मतमोजणी सुरू झाली यामध्ये पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत. शिवसेना शिंदे गट आमदार किशोर दराडे 1775 मतांनी आघाडीवरआहेत.

तीन प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते अशी, आमदार दराडे 11 हजार 145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे 9 हजार 370 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे 7 हजार 088. अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकमेकांची मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी अक्षरात 1 आकडा काढला असेल तर त्याला इंग्रजी 9 समजून आक्षेप घेतला जात आहे. हस्ताक्षरातील चूका शोधून मत बाद ठरविण्याकडे कल आहे.

आक्षेप घेतलेले मत डाऊटफुल बॉक्समध्ये टाकले जात आहेत. ज्या मतांवर आक्षेप आहे त्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या पसंती क्रमांकांना रिंगण केले किंवा एकच पसंती क्रमांक दोन उमेदवाराला दिले असे मत बाद ठरविले जात आहेत. बाद मते रिजेक्ट बॉक्समध्ये टाकली जात आहेत.मतमोजणी केंद्रावर तिन्ही प्रमुख उमेदवारांसह आणि आठ ते दहा उमेदवार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT