Nashik Teachers constituency Result : शिक्षक निवडणुकीत प्रचंड चुरस, शिंदे गटाच्या दराडेंना 1775 मतांची आघाडी

Vidhan Parishad Election : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Nashik Teachers constituency Result
Nashik Teachers constituency ResultSarkarnama

Nashik, 01 July : नाशिक विभाग शिक्षक परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. दुपारनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीत धक्कादायक स्थिती पुढे येत आहे.

नाशिक (Nashik) विभाग शिक्षक मतदार संघात (Teachers constituency) आज झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीत शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे (Kishor Darade) सतराशे मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी अनपेक्षित आघाडी घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

आज सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. मतपत्रिकांचे गठ्ठे केल्यानंतर दुपारी मतमोजणी सुरू झाल. यामध्ये पहिल्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत.

शिवसेना शिंदे गट आमदार किशोर दराडे 1775 मतांनी आघाडीवर आहेत. तीन प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते अशी आहेत. आमदार किशोर दराडे - 11 हजार 145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे 9 हजार 370 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांना 7 हजार 088 मते मिळाली आहेत.

मतमोजणी केंद्रावर तीनही प्रमुख उमेदवारांसह आठ ते दहा उमेदवार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत ही मतमोजणी सुरू आहे. अद्याप अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Edited By : Vijay Dudhale

Nashik Teachers constituency Result
Vidhan Parishad Election : फडणवीसांनी सोशल इंजिनिअरिंगला दिला प्रादेशिक समतोलाचा टच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com