Maratha Reservation Sarkarnama
नाशिक

Maratha Reservation : ''आरक्षण मिळत नाही तोपर्यंत, गावात नेत्यांना प्रवेश नाही'' ; नाशिकमधील तीन गावांचा निर्णय!

Maratha Agitation : नाशिकमधील लाखलगावसह कालवी, गंगापाडळी या गावांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

संपत देवगिरे ः सरकारनामा

Maratha Society : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात येता येणार नाही, असा एकमुखी निर्णय घेत लाखलगाव, कालवी व गंगापाडळी या तीन गावांतील ग्रामस्थांनी घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गावांच्या प्रवेशद्वारावर मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी करणारे फलक लावण्यात आले असून तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचेही या फलकांद्वारे सूचित करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत लाखलगाव कालवी व गंगा पाडळी या गावातील ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत गावाच्या मुख्य चौकात मराठा आरक्षणाचे मागणी करणारे व सर्वपक्षीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असणारे फलक लावले आहेत. यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

(Edited by-Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT